JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आमची मैत्री राम-लक्ष्मणासारखी राहावी', Bigg Boss Marathi फेम विकास-विशालचा Photo Viral

'आमची मैत्री राम-लक्ष्मणासारखी राहावी', Bigg Boss Marathi फेम विकास-विशालचा Photo Viral

बिग बॉस मराठीचा तिसरा (Bigg Boss Marathi Season 3) सीझन संपून बराच काळ लोटला असला तरी यातील स्पर्धकांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. अनेकदा हे स्पर्धक एकत्र देखील स्पॉट झाले आहेत. विशाल आणि विकासने अलीकडेच एक फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल: बिग बॉस मराठीचा तिसरा (Bigg Boss Marathi Season 3) सीझन संपून बराच काळ लोटला असला तरी यातील स्पर्धकांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. कुठेही हे स्पर्धक (Bigg Boss Marathi Season 3 Contestants) स्पॉट झाले की त्यांचे फोटो व्हायरल होतात. अनेकदा हे कलाकार स्वत: देखील काही फोटो शेअर करत असतात. बिग बॉसच्या घरात या स्पर्धकांची एकमेकांशी मैत्री होण्यापेक्षा एकमेकांशी वैर पत्करल्याच्या घटना अधिक आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्येही असंच काहीसं झालं होतं. मात्र याठिकाणी एक मैत्रीचं नातं, एक ‘Bro Code’ देखील पाहायला मिळाला- तो म्हणजे विशाल निकम आणि विकास पाटील (Vishal Nikam and Vikas Patil) यांच्यामध्ये. विशाल निकमने (Bigg Boss Marathi Season 3 winner Vishal Nikam) हे तिसरे पर्व जिंकले होते. बिग बॉसचे पर्व संपल्यानंतरही ते अनेकदा एकत्र दिसले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो हनुमान जयंती दिवशीचा म्हणजे 16 एप्रिलचा आहे. विशाल-विकास या दोघांनीही हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हे वाचा- बिग बॉस फेम सोनाली पाटीलची इन्स्टा रील्स करताना झाली चांगलीच फजिती, भन्नाट Video Viral हनुमान जयंतीनिमित्त या दोघांनी हनुमानाचे दर्शन घेतले तेव्हाचा हा फोटो आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी असं कॅप्शन दिलं आहे की, ‘आज आम्ही दोघं बऱ्याच दिवसांनी भेटलो ते ही हनुमान जयंतीला त्यामुळे हनुमंताचे आशिर्वाद घेतले आहेत की आमची मैत्री राम-लक्ष्मणा सारखी आयुष्य भर राहावी! हीच बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना’.

संबंधित बातम्या

विशाल-विकासचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांची मैत्री अशीच कायम राहुदे अशा कमेंट्स चाहते करत आहेत. ‘ही दोस्ती तुटायची नाय’ अशीही कमेंट एका चाहत्याने केली आहे. हे वाचा- ‘सुख म्हणजे..’ फेम शालिनी ‘शेर शिवराज’मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, फर्स्ट लुक आला समोर बिग बॉस मराठी तीनचा (Bigg Boss Marathi 3) महाविजेता झाल्यानंतर सांगलीच्या विशाल निकमने जोतिबाचे दर्शन घेतेले होते. यावेळी देखील त्याच्यासोबत विकास पाटील होता. यानंतर या दोघांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे देखील दर्शन घेतले होते. तर गेल्या महिन्यात विशालने नवी कार खरेदी केली, त्यांनंतरही या मित्रांनी गोवा ट्रीप केली होती. विकास आणि मीनल शाह यांच्यासह विशाल त्याच्या गाडीतून गोव्याला पोहोचला होता. त्यावेळी त्यांचे काही व्हिडीओज आणि फोटोज व्हायरल झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या