मुंबई, 16 एप्रिल- सध्या सगळीकडं इन्स्टा रील्सचं (insta reel ) वारं जोरात आहे. कॉमन मॅन ते सेलेब्स दररोज नवीन ट्रेंड फॉलो करताना दिसतात. बिग बॉस मराठी (bigg boss marathi 3) फेम अभिनेत्री सोनाली पाटील (sonali patil ) देखील इन्स्टावर चांगलीच सक्रीय दिसते. तिचे विविध फोटोशूट असतील किंवा तिचे रील्स नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असतात. मात्र यावेळी सोनाली पाटीलला जरा इन्स्टा रील्स करणं महागात पडलं आहे. रील्स करताना तिची यावेळी मात्र चांगलीच फजिती झाली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोनाली पाटीलनं तिच्या इन्स्टावर एक भन्नाट रील्स शेअर केलं आहे. यामध्ये ती एका हिंदी गाण्यावर रील्स करताना दिसत आहे. मात्र ती तयार होण्यापूर्वी म्हणजे शॉट रेडी होण्यापूर्लीच हे गाणं वाजत आणि सोनालीची चालू व्हिडिओमध्ये चांगलीच फजिती होते. सोनालीनं हे मजेशीर रील्स शेअर करत म्हटलं आहे की, सगळ्यांसमोर जेव्हा रिल करतो आणि काउंट न होता डायरेक्ट गाणं लागतं तेव्हा 😂😂😂😂🙈🙈🙈…सोनालीची जरी फजिती झाली असली तरी तिचा व्हिडिओ मात्र चाहत्यांना आवडलेला आहे. या व्हिडिओवर कमेंटसहा लाईक्सचा वर्षाव होत आहे. वाचा- सेलिब्रिटी कपलचं भन्नाट रील्स आणि सनसनाटी डायलॉगबाजी पाहिली का? .सोनाली पाटीलने मराठी बिग बॉस सीझन 3 मधे आपली भाषा, व्यक्तिमत्व, आणि सौंदर्याच्या बळावर अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सोनाली बिग बॉस मराठीमुळं महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सोनाली पाटील मुळची कोल्हापूरची आहे. सोनाली शॉर्ट व्हिडिओ साठी खूप प्रसिध्द आहे. तिला TikTok गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. सोनालीनं छोट्या मोठ्या भूमिका साकारत आता मराठी मनोरंजन विश्वात तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
सोनाली पाटीलने ‘जुळता जुळता जुळतयं की’, घाडगे अँड सून, देव पावला, ‘देवमाणूस’ आणि ‘वैजू नं.१’ यासारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.