मुंबई 23 जून- बिग बॉस मराठीच्या WEEKEND चा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी काही सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या. इतकी भांडणारी लोक मी संपूर्ण जगात पहिली नाहीत असे महेश मांजरेकर यावेळी म्हणाले. तर गेल्या आठवड्यात सगळ्यात चांगली खेळणारी सदस्य म्हणून नेहाचे नाव घेतले. एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यादरम्यान सदस्यांनी घातलेल्या राड्याबद्दल देखील सदस्यांची कानउघडणी केली. या कार्यात टीम बी विजेती ठरली असे मला वाटत नाही आणि शिव घरात सोडलेला वळू आहे असं महेश मांजरेकर म्हणाले. नऊवारी साडी नेसवत या अभिनेत्रीने साजरा केला जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस कॅप्टनसी टास्कसाठी शिवची आणि वैशालीची एक डाव धोबीपछाड या कार्यादरम्यान झालेल्या चुकीच्या वर्तणुकीबद्दल शाळा घेतली. नेहाने या सगळ्या झालेल्या प्रकरणावर तिची बाजू मांडली. यामध्ये सुरेखाताई काहीतरी बोलतील असं मला वाटलं. त्यावर महेश यांनी सुरेखाताई शनिवार ते शनिवार बोलतात असा टोमणा मारला. नॉमिनेशन टास्क दरम्यान झालेल्या वादावरूनदेखील घरातील पुरुष स्पर्धकांना झापले. ‘मी या कार्यक्रमाचा होस्ट आहे मला लाज वाटायला लावू नका.’ असे मांजरेकरांनी घरातील सदस्यांना बजावले. आज WEEKEND चा डावमध्ये घरातील कोणता एक सदस्य बाहेर जाणार हे नक्की आज कळणार आहे. VIDEO: अरबाज- सोहेलच्या मुलांमध्ये भांडण लावून सलमान झाला वेगळा दरम्यान, शिव आणि विणामध्ये हिना फूट पाडत आहेत आणि हा बिचुकलेंचा प्लॅन आहे असं विणाचा चाहता म्हणाल्यावर हिनाने त्याला स्पष्ट नकार दिला. यावेळी महेश मांजरेकरांनी काही म्हणी सांगितल्या आणि त्या म्हणी कोणत्या सदस्याला लागू पडतात हे सदस्यांना सांगायचे आहे. “हातच सोडून पळत्याच्या मागे” यावर विणाने परागचे नाव घेतले आणि परागने विणाचे नाव घेतले. तर वैशालीने तिच्या मधुर आवाजात नाम गुम जायेगा हे गाणं गाऊन दाखवलं. अजून काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहाच. शाळेत मुलीची मस्करी केल्यामुळे भडकल्या स्मृती इराणी, दिलं जशास तसं उत्तर VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला