लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे 'बिग बॉस'. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. अशातच ‘बिग बॉस मराठी 4’2 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे चाहते मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत.
प्रेक्षकांना आता 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीजनची ओढ लागली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संभाळणार आहेत.
बिग बॉसच्या घरात जसे मोठमोठे वाद होतात तसे मोठी प्रेम प्रकरणही पहायला मिळतात. आतापर्यंतच्या झालेल्या सीझनमधील अनेक लव्हबर्डच्या जोड्या चर्चेचा विषय ठरल्या. यातील एक म्हणजे राजेश श्रुंगारपूरे आणि रेशम टिपणीस. . राजेश व रेशम दोघेही विवाहित होते त्यामुळे त्यांचे असं एकत्र राहणे प्रेक्षकांना खटकत होते. अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली. नाशिकमध्ये तर एका व्यक्तीने त्यांच्याविरोधाता आक्षेपार्ह वर्तन आणि संवाद करत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.
दुसरी जोडी म्हणजे सई लोकूर आणि पुष्कर जोग. पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यात 'कुछ तो गडबड है' अशी चर्चाही रंगली होती. 'बिग बॉस'च्या घरात दोघांचं चांगलं जमत होतं. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वावरताना दिसलेली.
शिव ठाकरे आणि वीणा जगताप बिग बॉस मराठी 2 चे हॉट कपल. विशेष म्हणजे ही जोडी फक्ता घरातच एकत्र दिसली नाही तर घराबाहेर देखील एकत्र दिसली. त्यानंतर काही दिवसातच दोघांच्यात ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील लव्हबर्ड्सची जोडी म्हणजे पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले. परागने अनेवेळा रुपालीसाठी असलेलं प्रेम अप्रत्यक्षपणे व्यक्त केलं. रूपालीने मात्र वारंवार त्याच्या प्रेमाला नकार दिला. ती त्याला एक चांगला मित्र समजत असल्याचे रूपालीने वारंवार सांगितलं आहे.
'बिग बॉस मराठी' चा तिसरा सीजन प्रचंड गाजला. या शोमध्ये विशाल निकम आणि सोनाली पाटीलची हटके केमिस्ट्री आणि त्यांनतर त्यांच्यात झालेला वादसुद्धा प्रचंड चर्चेत आला होता.
बिग बॉस मराठी 3 मध्ये जय दुधाणे आणि स्नेहा वाघची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. दोघांमधील मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.