Shiv Thakare
मुंबई, 16 फेब्रुवारी : बिग बॉस मराठी 2चा विजेता झाल्यानंतर अमरावतीच्या मराठमोळ्या शिव ठाकरे नं बिग बॉस 16मध्येही आपला डंका वाजवला. आपला माणूस बनून शिव ठाकरेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. 130हून अधिक दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर शिव टॉप 2पर्यंत पोहोचला आणि फर्स्ट रनरअप ठरला. एमसी स्टेन नं बिग बॉसची ट्रॉफी जिंकली असली तरी शिवनं संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील प्रेक्षकांची मनं जिंकली. आधी रोडीज त्यानंतर बिग बॉस मराठी आणि आता बिग बॉस 16 मधून शिव ठाकरे हे नाव देशातील घराघरात ओळखलं जाऊ लागलंय. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला शिव ठाकरे या इंडस्ट्रीत येणाऱ्या सगळ्यांसाठीत नवी प्रेरणा आणि आदर्श ठरला आहे. शिव अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्यासाठी मेहनत घेतोय. पण या फिल्डमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना शिवनं शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आहे. तसं शिवचं शिक्षण किती झालंय हे माहितीये का? पाहूयात. शिव म्हणाला, ‘तुमचं शिक्षण पूर्ण करा. शिक्षणाचा बॅक हवाच. फक्त शिक्षण घेऊन मला जॉब मिळेल म्हणून शिकू नका. कारण तुम्ही कोणत्याही फिल्डमध्ये जाता तेव्हा तुमच्या शिक्षणामुळे तुमची विचार करण्याची शक्ती वाढते. तुम्ही जेव्हा चार चौघात बसता तेव्हा तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी कळतात त्या तुम्हाला शिक्षणामुळे मिळतात. जर तुम्हाला अभिनय क्षेत्रात यायचं आहे तर तुम्ही घेतलेलं शिक्षण तिथे उपयोगी येतं. तिथे पाढांतरासाठी शिक्षणाचा उपयोग होतो. काहींना हातात स्क्रिप्ट मिळाली की ते पाठ होण्यासाठी 1-1 तास लागतो. तर काही काही ते 10 मिनिटात 5-10 पान पाठ करतात. त्यामुळे आधी शिक्षण घ्या. शिक्षण कधीच वाया जात नाही’. हेही वाचा - Shiv Thakare Exclusive: कसं झालं शिवचं बिग बॉसमध्ये सिलेक्शन? अनेक वर्ष करत होता प्रयत्न शिव पुढे म्हणाला, ‘कोणतीही फिल्ड निवडताना तुम्हाला 10 लोक बोलतील की हे आपल्यासाठी नाही. पण जर शेवट पर्यंत रिस्क घेऊन ती गोष्ट सोडायची नाही अशी हिंमत तुमच्यात असेल तरच त्या फिल्डमध्ये जा. त्या फिल्डमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहिलात तर 100 टक्के तुम्हाला यश मिळेल’.
‘तुमचा लुक तुम्ही कसे दिसता यापेक्षातुम्ही काम कसं करता हे ही पाहिलं जातं. जर तुम्ही काम नीट करता तर तुम्ही स्मॉर्ट दिसाल. पण जर नुसतंच स्मॉर्ट दिसत असाल आणि काम येत नसेल तर तुम्ही घाणेरडेच दिसाल. त्यामुळे तुम्हाला अभिनय क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही चांगलं काम करा. काम करताना 10 लोकांमधील 7 लोक तुमचे पाय ओढतील पण 3 लोक तुम्हाला नक्कीच पुढे जाण्यासाठी मदत करतील’, असंही शिव म्हणाला.
शिवनं इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे. त्याला डान्समध्ये आवड होती. पण आई वडिलांच्या इच्छेसाठी मी इंजिनिअरिंग केलं. शिव म्हणाला, ‘शिक्षणाचं एक बॅकअप सर्वांना लागतं. घरचे म्हणाले, आम्हाला तुझ्या फिल्डविषयी माहिती नाही. पण आम्हाला हे माहिती आहे की इंजिनिअरिंग करून तू उपाशी नाही राहणार’.