मुंबई, 30 जुलै- टीव्हीवरील लोकप्रिय शो (Tv Show) ‘बिग बॉस’ ची नेहमीचं चर्चा असते. बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) ची उत्सुकता लागली आहे. या पर्वासाठी चाहते खुपचं उत्सुक आहेत. दिवसेंदिवस नव्या पर्वाबद्दल काही ना काही नवीन गोष्टी समोर येत असतात. आत्ता चाहत्यांची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण नुकताच ‘बिग बॉस 15’ च्या घराची सुंदर फोटो समोर (Bigg Boss House Photos) आली आहेत. त्यामुळे या पर्वासाठी चाहते आणखीनचं उत्सुक झाली आहेत. टीव्हीवरील बहुचर्चित शो बिग बॉस यावेळी सहा आठवडे आधी OTT वर प्रक्षेपित होणार आहे. आणि त्यांनतर टीव्हीवर शिफ्ट केलं जाणार आहे. हे आपण सर्वचजण जाणतो. पुढच्या आठवड्यापासून ‘बिग बॉस 15’ OTT वर दाखवलं जाणार आहे. OTT वर या शोचं होस्टिंग दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. त्यांनतर हा शो टीव्हीवर शिफ्ट झाल्यानंतर नेहमीप्रमाणे शोचं होस्टिंग अभिनेता सलमान खान करणार आहे. त्यामुळे नव्या पर्वाबद्दल चाहते खुपचं उत्सुक आहेत. नुकताच चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवणारी एक गोष्ट घडली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे, ‘बिग बॉस 15’ च्या घराची सुंदर फोटो सर्वांसमोर आली आहेत. या फोटोमध्ये बिग बॉसचं घर खुपचं रॉयल दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांनाचं बिग बॉस पाहण्याची उत्कंठा लागली आहे. ‘बिग बॉस 14’ नंतर लगेचच 15 व्या सिझनची लगबग सुरु झाली होती. बिग बॉसच्या घराची फोटो समोर आल्यानंतर या पर्वातही खुपचं धम्माल होणार असल्याचं दिसत आहे. (हे वाचा:
‘पन्नाशीतही कपडे घालायचा सेन्स नाही’; स्पोर्ट्स ब्रा लुकमुळे मलायका पुन्हा ट्रोल
) ‘बिग बॉस 15’ ची घोषणा होताचं, यामध्ये कोणकोणते स्पर्धक असणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. अनेक कलाकरांच्या नावाची चर्चासुद्धा होतं आहे. तसेच दिशा वकानी, हर्षद चोप्रा, अर्जुन बिजलानी, अनुषा दांडेकर, मल्लिका शेरावत, आशिका भाटीया तसेच आस्था गिलला मेकर्सनी अप्रोच केल्याचं म्हटलं जातं आहे.