JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शिव ठाकरे-शिवानी बावकरमध्ये खुललं प्रेम; वाचा VIRAL फोटोमागचं सत्य

शिव ठाकरे-शिवानी बावकरमध्ये खुललं प्रेम; वाचा VIRAL फोटोमागचं सत्य

शिव ठाकरे आणि शिवानी बावकरचे फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतं आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जुलै-  सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरे (Shiv Thakrey)  आणि ‘लागीर झालं जी’ फेम शिवानी बावकरचे (Shivani Baokar) फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Photo) होतं आहेत. अनेकांना हा प्रश्न पडला आहे, की हे दोघेही सोबत कसे? किंवा अनेकांना असं वाटत आहे, की हे दोघांमध्ये नेमकं काय सुरु आहे. मात्र यामागे कारण काही वेगळच आहे. चला तर मग पाहूया काय आहे या फोटोंच्या मागचं नेमकं कारण.

संबंधित बातम्या

शिव ठाकरे हा एक प्रसिद्ध कलाकार आहे. MTVवरील ‘रोडीज’ आणि ‘बिग बॉस मराठी’ मुळे शिवला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. तर दुसरीकडे ‘लागीर झालं जी’ या झी मराठीवरील मालिकेमुळे शिवानी बावकर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांचा आपला एक विशेष चाहतावर्ग आहे. हा चाहतावर्ग या दोन्ही कलाकारांच्या प्रत्येक अपडेट्सवर लक्ष ठेवून असतो. त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे, हे जाणून घेण्यामध्ये त्यांना मोठं रस असतं. त्यामुळेचं सोशल मीडियावर शिव आणि शिवानीचे फोटो व्हायरल होताचं या दोघांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. (हे वाचा: रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने घडवली अद्दल, आता पोलीस… ) तर तुम्हालाही या फोटोंचं कारण जाणून घ्यायला आवडेल. तर सध्या व्हायरल होतं असलेले या दोघांचे हे फोटो एका गाण्याच्या सेटवरील आहेत. लवकरच शिव आणि शिवानी हे एका नवीन गाण्यामध्ये झळकणार आहेत. हे एक रोमँटिक गाणं असणार आहे. पुणे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्या गाण्याचं शुटींग पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये झालं आहे. आणि याचशुटींगदरम्यानचे हे फोटो आहेत. यामध्ये शिव क्रिकेट खेळताना दिसत आहे. तर त्याचवेळी शिवानीही तेथून जात असते. चाहत्यांना या दोघांच्याही नव्या गाण्याच्या मोठी उत्सुकता लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या