मुंबई, 26 सप्टेंबर: बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi 3) सध्या सगळीकडे चर्चा आहे. बिग बॉस जरी वादग्रस्त शो म्हणून चर्चेत असला तरी या शोमध्ये अनेकांची मने जुळ्याल्याचे आपण पाहिले आहे. शिव आणि वीणा यांची देखील अशी जोडी आहे जी याच घऱात एकत्र आली आणि एकमेकांच्या प्रेमात (Love Relationhip In Bigg Boss Marathi House) पडली. आता देखील या शोमध्ये सहभागी होण्याआधीच जय दुधाणे याने सांगितले आहे की, शोसाठी कोणोसबत कनेक्शन जोडावे लागले तर मी ते देखील करेल. आता यानंतर शोमध्ये जयची नव्याने झालेली मैत्रीण अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar Relationhip) देखील एका व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. गायत्रीने प्रेमाची कबुली देत लगेच I LOVE U देखील म्हटले आहे. सध्या गाय़त्रीचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायत्री दातारने बिग बॉस मराठीच्या घरात तिचा जवळचा मित्र मराठी अभिनेता विकास पाटील याच्यासोबत प्रवेश केला होता. त्यानंतर आता बिग बॉसच्या घऱातील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Bigg Boss Marathi 3 मधील ‘या’ स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा यामध्ये ती तिच्या प्रियकराला फ्लाईंग किस देत आहे तर त्याच्यासोबत प्रियकरासोबत प्रेमाच्या प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे. बिग बॉससमोर ती चक्क रुसतेय आणि लाजताना देखील दिसत आहे. सर्वांना तिचा घरातील हा प्रियकर कोण आहे असा हा व्हिडीओ पाहून प्रश्न पडला आहे.
गायत्रीच्या या प्रियकराचे नाव बिग बॉसच आहे. बिग बॉसच्या प्रेमात पडली आहे आणि त्यांच्यासोबतच ती काही गोष्टी शेअर करत आहे सोबत तिने I LOVE U देखील म्हटले आहे. आता तिचा हा प्रेमाचा प्रस्ताव बिग बॉस स्वीवकारणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.