JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना भेटताच ढसाढसा रडली भारती; कपिल शर्मालाही अश्रू अनावर

राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना भेटताच ढसाढसा रडली भारती; कपिल शर्मालाही अश्रू अनावर

राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना भेटताच भारती सिंहला अश्रू अनावर होत हे ढसाढसा रडली. तिचे फोटो समोर आलेत.

जाहिरात

भारती सिंह आणि कपिल शर्मा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  26 सप्टेंबर : टेलिव्हिजनवरील  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. जीममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका . तब्बल 42 दिवस रुग्णलायात सुरू असलेली झुंज अखेर उपयशी ठरली आणि 21 सप्टेंबरला राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. कॉमेडियनच्या जाण्यानं कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला. राजू यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मुंबईमध्ये त्यांच्यासाठी शोकसभा आणि प्रार्थना सभा आयोजित केली होती. ज्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही त्या सगळ्यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रार्थना सभेला हजेरी लावली होती.  कॉमेडियन भारती सिंह, कपिल शर्मा सह जॉनी लिव्हर देखील उपस्थित होते. यावेळी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना भेटताच भारती सिंहला अश्रू अनावर होत हे ढसाढसा रडली. तिचे फोटो समोर आलेत. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी कॉमेडियन भारती सिंह प्रचंड भावुक झाली होती. तिच्याबरोबर तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि कपिल शर्मा देखील आले होते. प्रेयर मीटमध्ये कपिललाही अश्रू अनावर झाले होते. समोर आलेल्या फोटोमध्ये भारती भावुक झाल्याचं दिसत आहे. कपिल भारतीला सांभाळताना दिसत आहे. दोघांचा व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हेही वाचा - Viral Video : राजू श्रीवास्त यांच्या प्रार्थना सभेत हसून पोज दिल्याने जॉनी लीवर ट्रोल

संबंधित बातम्या

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भारती आणि कपिल या दोघांनी त्यांच्या स्ट्रगल काळात राजू यांच्याबरोबर काम केलंय. केवळ कामच नाही तर त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या आहेत.  त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या प्रार्थना सभेत आलेल्या जॉनी लिव्हर यांना मात्र वेगळ्याच कारण्यासाठी ट्रोल केलं गेलं. प्रार्थना सभेला आलेल्या जॉनी यांनी मीडियासमोर हसून पोझ दिल्यानं ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. सोशल मीडियावर जॉनी यांच्यावर टीका केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या