मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Viral Video : राजू श्रीवास्त यांच्या प्रार्थना सभेत हसून पोज दिल्याने जॉनी लीवर ट्रोल

Viral Video : राजू श्रीवास्त यांच्या प्रार्थना सभेत हसून पोज दिल्याने जॉनी लीवर ट्रोल

johnny lever

johnny lever

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.20 वाजता निधन झाले. तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज देत होते राजू श्रीवास्तव अखेर ही लढाई हरले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 26 सप्टेंबर : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे  21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.20 वाजता निधन झाले. तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज देत होते राजू श्रीवास्तव अखेर ही लढाई हरले. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे मोठी शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यासाठी रविवारी संध्याकाळी मुंबईत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये त्याच्या चाहत्यांची आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी पहायला मिळाली होती. यावेळी कॉमेडियन जॉनी लीवरनेही हजेरी लावलेली पहायला मिळाली. मात्र त्यांच्या समोर आलेल्या व्हिडीओमुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

जॉनी लीवर यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रार्थना सभेला हजेरी लावली. यावेळीचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जॉनी हसताना दिसत आहे. याशिवाय ते पापाराझींना पोजही देताना दिसले. त्यांचं हसू पाहून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी वेळेचं काही गांभीर्य आहे की नाही, अशा कमेंट करत जॉनी लीवरला प्रश्न केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Elite (@eliteshowbiz)

राजू श्रीवास्तव यांच्या स्मरणार्थ आयोजीत केलेल्या प्रेयर मीटमध्ये जॉनी लिव्हर, सुनील पाल, कपिल शर्मा, भारती सिंग, किकू शारदा यांसारखे अनेक टॉप कॉमेडियन सहभागी झाले होते.  या प्रार्थना सभेत सहकारी कलाकारांव्यतिरिक्त प्रसिद्ध व्यक्तींनीही हजेरी लावली. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिावर व्हायरल होत आहे.

राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हापासून ते अनेक दिवस रुग्णालयात होते. त्यांच्या हेल्थ अपडेटविषयी अनेक बातम्या समोर येत होत्या. मात्र अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Comedian, Comedy actor