मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये आलेला Heart Attack, हृदयविकाराच्या या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये आलेला Heart Attack, हृदयविकाराच्या या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

Raju Srivastava Suffers Heart Attack: कॉमेडियन राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला. जिम करताना हृदयविकाराचा झटका कशामुळे येऊ शकतो? जिमचा हृदयविकाराचा काही संबंध आहे का? चला हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

Raju Srivastava Suffers Heart Attack: कॉमेडियन राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला. जिम करताना हृदयविकाराचा झटका कशामुळे येऊ शकतो? जिमचा हृदयविकाराचा काही संबंध आहे का? चला हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

Raju Srivastava Suffers Heart Attack: कॉमेडियन राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला. जिम करताना हृदयविकाराचा झटका कशामुळे येऊ शकतो? जिमचा हृदयविकाराचा काही संबंध आहे का? चला हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : आपल्या कॉमेडीने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा आज मृत्यू झाला. त्यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका (Gym Cause Heart Attack) आला होता. रिपोर्ट्सनुसार, ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेथे 41 दिवस चाललेल्या उपचारानंतरही अखेर त्यांचा मृत्यू झाला. राजू श्रीवास्तव 58 वर्षांचे होते, ते त्यांच्या चांगल्या फिटनेससाठी ओळखले जात होते. अनेक प्रकरणांमध्ये, असे दिसून आले आहे की, जिममध्ये व्यायाम करताना, लोकांना हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येतो. अखेर हे कोणत्या कारणामुळे घडते? जिमचा हृदयविकाराशी काही संबंध आहे का? याबाबत हृदयरोगतज्ज्ञांकडून महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

हृदयविकाराच्या झटक्याशी जिमचा संबंध?

नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटल मधील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वनिता अरोरा यांच्या मते, सर्व लोकांनी जिममध्ये जाण्यापूर्वी कार्डियाक कन्सल्टंट करणे आवश्यक आहे. विशेषत: जे लोक 30 किंवा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, त्यांनी वेट लिफ्टिंग, कार्डिओ, वेट ट्रेनिंग, ट्रेडमिल करण्यापूर्वी कार्डिओलॉजिस्टला नक्कीच भेटावे. अनेक वेळा जीममुळे आपल्या हृदयाच्या ईसीजीमध्ये बदल होतात, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्याने हृदयविकाराचा झटका येतो. आजच्या युगात कोरोनरी आर्टरीचा आजार तरुणांमध्येही आढळतो, त्यामुळे हृदयाबाबत कोणत्याही वयात काळजी घेणे आवश्यक आहे.

सप्लिमेंट्स घेतल्याने धोका वाढतो

डॉ. वनिता अरोरा सांगतात की, कमी वेळात उत्तम शरीर बनवायचे असेल तर सर्व तरुण सप्लिमेंट्स घेऊन जिम करतात, पण असे करू नये. सप्लिमेंट घेतल्यानंतर जीम केल्याने हृदयाचे ठोके अबनॉर्मल होतात. यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पटकन शरीर तयार करण्यासाठी जिममध्ये तासनतास घालवणे देखील योग्य नाही. व्यायाम एका मर्यादेत करावा. जिम देखील पात्र प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली करावी, जेणेकरून समस्या टाळता येतील.

प्रोफेशनल लाईफमुळे पर्सनल लाईफवर होतोय परिणाम? या टिप्सचा होईल फायदा

या लोकांना जास्त धोका असतो

40 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना धोका आहे

शारीरिक हालचालींशिवाय जीवनशैली

जास्त धूम्रपान करणारे

हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेले लोक

इतर गंभीर आजार असलेले लोक

हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सल्ला

डॉ. वनिता अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराने त्रस्त असलेल्या लोकांना जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात नाही. उद्यानात जाऊन 40 मिनिटांत 4 किमी चालून ते तंदुरुस्त राहू शकतात. मात्र, ज्यांना व्यायामशाळेत जायचे आहे, त्यांनी प्रथम हृदयरोगतज्ज्ञांशी बोलावे. ट्रेडमिलवर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका. वेट ट्रेनिंग करू नये. जर तुम्हाला एरोबिक्स करायचे असेल तर थोडा वेळ करा.

सप्लीमेंट घेऊन जिममध्ये जाऊ नका

अनेक तास जिममध्ये व्यायाम करू नका

एनर्जी ड्रिंक्स टाळा

अडचण आल्यावर जिम बंद करा

गॅटोरॉइड किंवा लिंबूपाणी प्या

निरोगी आहार घ्या

First published:
top videos

    Tags: Heart Attack