JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतो’, करीना कपूरला धमकी

‘तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतो’, करीना कपूरला धमकी

‘करीना कपूरला सीतेची भूमिका करु देणार नाही’; 12 कोटी मागणाऱ्या करीना कपूरला मिळतायेत धमक्या

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 जून**:** बॉलिवूडची बेबो करीना कपूर (Kareena Kapoor) लवकरच सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहे. परंतु पुनरागमन करण्यापूर्वीच ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. (Hindu mythology) तिनं एका पौराणिक चित्रपटासाठी तब्बल 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. या चित्रपटात ती भगवान श्री राम यांची पत्नी सीतेच्या भूमिकेत झळकणार होती. परंतु ही बातमी कळताच तिच्याविरोधात संतापाची लाट उसळली. करीना सीतेच्या भूमिकेसाठी योग्य नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्याविरोधात बायकॉट करीना (#BycottKareenaKapoorKhan) असा प्रचार सुरु केला. हा प्रचार कमी होता की काय आता या वादात बजरंग दलानं (Bajrang Dal) देखील उडी घेतली आहे. जर का या चित्रपटात करीना कपूर झळकली तर या चित्रपटाला प्रदर्शित होऊ देणार नाही असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे. ‘शाहरुखनं दिले होते 300 रुपये’; ‘फॅमेली मॅन’च्या बायकोनं सांगितला अविस्मरणीय किस्सा टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करीनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिलं आहे. जर करीना कपूरला घेऊन हा चित्रपट तयार करण्याचा घाट घातला गेला तर आम्ही त्याच्यावर बंदी घालू असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. शिवाय आपल्या निवेदनात त्यांनी करीनाचे बिकिनी फोटो आणि ती अजमेर दरगाहला गेलेली असतानाचे फोटो देखील दिले आहेत. Hot शालूचा Bold डान्स; राजेश्वरीच्या videoला काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यानं प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “वारंवार हिंदू धर्मावरच चित्रपट का तयार केले जातात? शिवाय या चित्रपटांमध्ये मुस्लीम कलाकारांना महत्वाच्या भूमिका दिल्या जातात. ही मंडळी हिंदू देवतांच्या नावावर कोट्यवधी रुपये कमावतात. आणि नंतर आमच्याच देवांवर आणि संस्कृतीवर टीका करतात. यापूर्वी करीना आणि तिचा पती सैफ अली खान यानं हे प्रकार अनेकदा केले आहेत. त्यामुळं अशा लोकांना आम्ही सीतेसारखी पवित्र भूमिका साकारु देणार नाही. आणि जर करीनासोबत हा चित्रपट तयार केला गेला तर त्याला विरोध केला जाईल. आज आम्ही यासंबंधी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या