‘शाहरुखनं दिले होते 300 रुपये’; 'फॅमेली मॅन'च्या बायकोनं सांगितला अविस्मरणीय किस्सा

द फॅमेली मॅन फेम प्रियमणीला शाहरुख खानकडून मिळाले होते 300 रुपये; कारण...

द फॅमेली मॅन फेम प्रियमणीला शाहरुख खानकडून मिळाले होते 300 रुपये; कारण...

  • Share this:
    मुंबई 18 जून: द फॅमेली मॅन (The Family Man) या वेब सीरिजमुळं दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणी (Priyamani) सध्या प्रचंड चर्चेत आहे. मनोज वाजपेयीसोबतची तिची केमिट्री प्रेक्षकांचा प्रचंड आवडली. त्यामुळं रातोरात ती बॉलिवूड प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षक तिच्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान प्रियमणीनं देखील चाहत्यांना नाराज न करता असाच एक थक्क करणारा प्रसंग सांगितला. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं तिला 300 रुपये दिले होते. (Shah Rukh Khan gave 300 rupee to Priyamani) त्या 100च्या तीन नोटा तिनं आजही आपल्या पर्समध्ये सांभाळून ठेवल्या आहेत. Hot शालूचा Bold डान्स; राजेश्वरीच्या videoला काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज चेन्नई एक्सप्रेस (Chennai Express) हा शाहरुख खानचा एक सुपरहिट चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील 1,2,3,4 या गाण्यात प्रियमणी देखील झळकली होती. ती या गाण्यात एक्स्ट्रा डान्सर होती. या गाण्याच्या निमित्तानं तिची भेट शाहरुखशी झाली. त्यावेळी त्यानं तिच्यासोबत कौन बनेगा करोडपती हा खेळ खेळला होता. तिनं शाहरुखच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली त्यामुळं त्यानं खुश होऊन तिला 300 रुपये भेट स्वरुपात दिले. राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट प्रियमणी शाहरुखची खूप मोठी फॅन आहे. तिनं त्या 100 च्या तीन नोटा अगदी जपून ठेवल्या आहेत. त्या नोटा कायम तिच्या पाकिटात असतात. जेव्हा कधी तिला आत्मविश्वास ढासळत असल्याची जाणिव होते. त्यावेळी ती या पैशांकडे पाहते अन् तिला पुन्हा एकदा नव्या जोमानं काम करण्याची प्रेरणा मिळते. प्रियमणीनं अलिकडेच द फॅमिली मॅनच्या निमित्तानं झूम टीव्हीला मुलाखत दिली. यावेळी तिनं हा थक्क करणारा अनुभव सांगितला. पुढे ती म्हणाली तिला शाहरुखसोबत एखदा रोमँटिक चित्रपट करायचा आहे. अन् एक दिवस ते स्वप्न पूर्ण होईल अशी तिला खात्री देखील आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published: