JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Archna Puran Singh Birthday: अर्चना पूरण सिंग यांची आहे अफाट संपत्ती, खूर्चीत बसून हसण्याचे मिळतात इतके लाख

Archna Puran Singh Birthday: अर्चना पूरण सिंग यांची आहे अफाट संपत्ती, खूर्चीत बसून हसण्याचे मिळतात इतके लाख

प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh Birthday) आज 60वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर अर्चना यांनी त्यांचं नाव सिद्ध केलं आहे. कॉमेडी सिनेमातून त्यांनी विशेष ओळख मिळवली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मार्च: प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh Birthday) आज 60वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर अर्चना यांनी त्यांचं नाव सिद्ध केलं आहे. कॉमेडी सिनेमातून त्यांनी विशेष ओळख मिळवली. अर्चना यांनी आतापर्यंत 100 हून अधिक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अर्चना पूरण सिंग यांनी द कपिल शर्मा शोच्या कायमस्वरुपी गेस्ट म्हणून 2017 साली नवज्योत सिंग सिद्धू यांची जागा घेतली होती. ज्यावरुन त्यावेळीही सोशल मीडियावर विशेष चर्चा झाली होती. या कार्यक्रमातून त्या त्यांच्या चाहत्यांच्या भेटीस येतात. या कार्यक्रमात गेस्ट म्हणून उपस्थित राहण्यासाठी त्यांचं मानधनही तगडं आहे. जाणून घ्या अर्चना पूरण सिंग यांच्या संपत्तीविषयी.. हे वाचा- ‘गौरवा’स्पद! प्रसिद्ध अमेरिकन रॅपर नव्या VIDEO मध्ये फ्लाँट करतेय भारतीय डिझायनरचा ड्रेस मीडिया अहवालांनुसार, अर्चना पूरण सिंग द कपिल शर्मा शो चा एक एपिसोड शूट करण्यासाठी 10 लाख रुपये घेतात. केवळ एका खुर्चीवर बसून कलाकारांच्या विविध जोक्सवर हसण्यासाठी त्यांना एवढी रक्कम मिळते आहे. मात्र इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक सिनेमांमध्ये-टेलिव्हिजनवर छोट्या-मोठ्या भूमिका केल्यानंतर त्यांनी ही संपत्ती कमावली आहे. द कपिल शर्मा शो या कॉमेडी शो आधी त्यांनी कॉमेडी सर्कसच्या परिक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे. मुंबईच्या मड आयलँडमध्ये त्यांचा एक खासगी बंगला देखील आहे. रिपोर्ट्सनुसार त्यांची संपत्ती (Archana Puran Singh Net Worth) 220 कोटींपेक्षाही जास्त आहे.

संबंधित बातम्या

अर्चना पूरण सिंग यांची Love Story अर्चना पूरण सिंग आणि परमीत सेठी यांची प्रेमकहाणी देखील फिल्मी आहे. एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार परमीतचे आई-वडील या लग्नाच्या विरोधात होते, त्यामुळे त्यांनी चार वर्षापर्यंत या लग्नाबाबत त्यांनी सांगितलंच नव्हतं. त्यांनी परमीतसह 30 जून 1992 मध्ये लग्न केलं होतं. पहिल्या लग्नात नाखूश असणाऱ्या अर्चना यांनी परमीतशी दुसरं लग्न केलं आहे. हे वाचा- निवडणूक हरल्यानंतर आता The Kapil Sharma Show मध्ये सिद्धू परत आल्यास अर्चना काय करणार? अभिनेत्री म्हणाली… मिसेस ब्रिगेंझा ही ‘कुछ कुछ होता हैं’ मधील भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. ‘अभिषेक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्री राजा हिंदूस्तानी, आशिक आवारा, शोला और शबनम, जलवा, मौहब्बतें या अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या