मुंबई, 13 मार्च: पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक हरल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu The Kapil Sharma Show) यांच्यासह ‘द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) फेम अर्चना पूरन सिंग (Archana Puran Singh) यांचंही नाव चर्चेत आलं आहे. सोशल मीडिया सध्या ‘मीम्समय’ झालं आहे, त्यामुळे या विषयावर देखील मीम्स येत आहे. द कपिल शर्मा शोच्या प्रेक्षकांना असं वाटत आहे की, आता निवडणूक हरल्यामुळे सिद्धू पुन्हा एकदा या शोमध्ये परत येतील आणि त्यामुळे अर्चना यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. नेटिझन्सच्या या थेअरीवर स्वत: अभिनेत्री अर्चना पूरन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि स्वत:चा शोमधून बाहेर जाण्याबाबत भाष्य केले आहे. नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व विधानसभा सीटसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र आम आदमी पार्टीच्या जीवनज्योती कौर यांनी त्यांना धूळ चारली. सिद्धू यांची हार होताच नेटिझन्सना मीम्स आणि खिल्ली उडवण्यासाठी नवा विषय मिळाला आहे. या विषयावरील मीम्स वेगाने व्हायरल होत आहे. TOI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्चना पूरन सिंग म्हणाल्या की, मीम्स त्यांच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आहे. हे वाचा- पाकिटमारीच्या आरोपात प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, बॅगेतून एवढी रक्कम जप्त यावेळी त्या म्हणाल्या की, ‘मी या मीम्समुळे प्रभावित झाले नाही आहे. कारण माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही आहे. मला याचं आश्चर्य वाटतं की ज्याने हा शो सोडला आहे आणि राजकारणात गेला आहे, त्याचा संबंध आज मी जे काही करते आहे त्याच्याशी कसा काय जोडला जाऊ शकतो. मी कधी राजकारणात नव्हते. पण जेव्हा कधी सिद्धूविषयी काही घडतं, मीम्स माझ्यावर बनवले जातात. हे विचित्र नाही आहे का?’ हे वाचा- ‘या’ आजारामुळे 11 वर्षे आई बनू शकली नाही अभिनेत्री, व्यक्त केली खंत अर्चना पूरन सिंग यांनी द कपिल शर्मा शोच्या कायमस्वरुपी गेस्ट म्हणून 2017 साली नवज्योत सिंग सिद्धू यांची जागा घेतली होती. ज्यावरुन त्यावेळीही सोशल मीडियावर विशेष चर्चा झाली होती. अनेकदा कपिल शर्मा देखील या गोष्टीवरुन खिल्ली उडवताना दिसतो.
अर्जना यावेळी म्हणाल्या की त्यांना असे वाटते की त्या कपिल शर्मा शोचा कायम एक भाग बनून राहतील. त्या म्हणाल्या की, ‘मला नाही माहित लोकांना असं का वाटतं की, माझ्याकडे याशिवाय कोणतही काम नाही आहे. जर केव्हा सिद्धू यांनी या शोमध्ये परत येण्याचे ठरवले किंवा चॅनेल अथवा प्रोड्युसर्सना सिद्धू यांना परत आणायचे असेल, तर मी नेहमी मुव्ह ऑन व्हायला आणि नवीन प्रोजेक्ट शोधण्यासाठी तयार आहे.’