मुंबई, 25 मार्च: प्रसिद्ध अमेरिकन रॅपर कार्डी बी (Cardi B Latest Music Video) नेहमी चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जगभरात कार्डी बी. चे चाहते आहेत. अगदी भारतातही या रॅपरचे असंख्य फॅन्स आहेत. तुम्हीही कार्डी बी चे फॅन असाल तर भारतीय म्हणून नक्कीच ‘गौरवा’स्पद वाटेल अशी बातमी आहे. कारण कार्डी बी जशी तिच्या गाण्यासाठी ओळखली जाते तशीच तिच्या फॅशन सेन्सचीही विशेष चर्चा होते. आता यामध्ये गौरवास्पद बाब अशी ही कार्डी बी च्या एका लेटेस्ट गाण्यातील ड्रेस भारतीय डिझायनरने (Cardi B Flaunting in Couture Design by Indian Designer) डिझाइन केला आहे. कार्डी बी ने गौरव गुप्ता या भारतीय डिझायनरचा ड्रेस (Cardi B in Gaurav Gupta Couture for the latest music video) परिधान केला आहे. गौरव गुप्ताने सोशल मीडियावर कार्डी बी चे काही व्हिडीओ आणि फोटोज शेअर केले आहेत. कार्डी बी च्या या गाण्याचा व्हिडीओ शेअर करताना गौरव गुप्ताने असे कॅप्शन दिले आहे की, ‘नो लव्ह या हिट गाण्याच्या रिमिक्ससाठी कार्डी बी गौरव गुप्ताच्या Couture मध्ये.. रोज फील्डमध्ये कार्डी ‘Gaurav Gupta Amorphous Shapeshifter Sculptural Outfit’ मध्ये वायू या घटकाचे प्रतिनिधित्व करते.’
गौरव गुप्ताने कार्डी बी चे काही फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती फारच स्टनिंग दिसते आहे. गौरव गुप्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओ आणि फोटोंवर भारतातील आणि देशाबाहेरील युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक सेलेब्सनी देखील त्याचे कौतुक केले आहे.
याआधी गौरवने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोजनुसार त्याने माधुरी दीक्षित नेने, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, जेनिफर हडसन, सिद्धार्थ चतुर्वेदी या बॉलिवूड स्टार्सचे लुकही डिझाइन केले आहेत. मात्र कार्डी बी चा लुक खास ठरला. यासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कार्डी बी चा हा व्हिडीओ आजच युट्यूबवर लाँच झाला आहे आणि त्यामध्ये ती अगदी स्वप्नवत दिसत आहे. यामध्ये कार्डी बी मोकळे लांबसडक केस फ्लाँट करते आहे, तर तिचा मेकअपही साजेसा आहे. कार्डीने या लुकसाठी Nude Lipstick ला पसंती दिली आहे. विशेष म्हणजे या लुकमध्ये तिने कोणतीही अॅक्सेसरी वापरली नाही आहे.