मुंबई 22 जून: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आपली मुलगी आलियासोबत नेहमी वेळ घालवताना दिसतो. तो आलियाचा (Aliyah Kashyap) सिंगल फादर आहे. पत्नी सोबत घटस्फोट झाल्यानंतर तो आलियाचा सांभाळ करत आहे. आलिया तिच्या शिक्षणासाठी अमेरीकेत असते. तर ती सोशल मीडिया फार सक्रिय असते. यासोबतच ती एक युट्युबरही आहे. युट्युबवर नेहमी ती तिचे विचार मांडत असते. आलियाने काही दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडचाही खुलासा केला होता. सोशल मीडियावर त्याच्यासोबत ती नेहमीच फोटो शेअर करताना दिसते. तर नुकताच झालेल्या फादर्स डे (Father’s day) निमित्त तिने अनुराग कश्यप सोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी एक चॅट सेशन केला होता. ज्यात ते अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
एका युझरने विचारलं की, ‘जर ती गर्भवती असती तर तुमची काय प्रतिक्रिया असती?’ यावर उत्तर देताना अनुराग म्हटला की, “मी विचारेन की तुला खरचं हे पाहिजे का? जे पण तु करशील मी तुझ्यासोबत आहे. आणि हे तुला माहिती आहे.” अनुराग पुढे म्हणाला, “मी ते स्वीकारेन, ती जे काही करेन मी तिची साथ देईन. मी तर हे पण म्हणेल की यासाठी तुम्हाला एक किमंत द्यावी लागते, पण शेवटी तरीही मी सोबत राहीण.”
आलियाने या सेशनला Asking your dad awkward questions अस नाव दिलं होतं. त्यांच्यासोबत आलियाचा बॉयफ्रेंडही होता. ते सेशनच्या आधी आइसक्रिम खाण्यासाठी गेले होते. तर आलिया स्वतः ड्राइव्ह करत त्यांना घेऊन गेली होती.
HBD: या साउथ सुपरस्टारने चक्क आपल्या फॅनसोबत केलं आहे लग्न; पाहा विजयचे खास PHOTOअनुरागलाही आलियाचा बॉयफ्रेंड आवडतो. त्याच्याविषयी बोलताना अनुराग म्हटला, “तो एक चांगला मुलगा आहे. मला तो आवडतो कारण तो अध्यात्मिक आहे.” हे ऐकून आलिया देखील खुश होते. अनुराग आणि मुलगी आलियाचं बाँडींग फार चांगलं आहे. ते मनमोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारतात.