मुंबई, 30 मार्च- विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi ) या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारली आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमृता खानविलकरचे या भूमिकेसाठी सगळीकडून कौतुक होत आहे. अशातच अमृताची ( Amruta Khanvilkar ) जवळची मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडेने देखील तिच्या या भूमिकेचे कौतुक केलं आहे. शिवाय लांबलचक पोस्ट लिहित **(Ankita Lokhande Latest Post )**तिच्यावरली प्रेम व्यक्त केलं आहे. अंकितानं नेमकं काय म्हटलं आहे पोस्टमध्ये ? अमृता खानविलकर आणि अंकिता लोखंडे यांच्या मैत्रीबद्दल सर्वांना माहितीच आहे. आपल्या मैत्रिणीच्या सिनेमाचा भलमोठं पोस्टर पाहून कुणाला कौतुक वाटणार आहे. म्हणून तर अमृताच्या चंद्रमुखीसाठी अंकितानं इन्स्टावर एक लांबसडक पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणते की, ‘‘अम्मू.. मला आपल्याबद्दल खूप सांगायचे आहे मात्र आजचा दिवस फक्त तुझा आहे. आज मला या संधीचा फायदा घेत सांगायचे आहे की तू माझ्यासाठी स्टार किंवा सेलिब्रिटी नाहीस तर तू एक सच्चा कलाकरा आहेस…. तू माझ्यासाठी कलाकार आहे. वाचा- 300 रंगाचा वापर अन् The Kashmir Files सिनेमाची प्रिंट, आता ही अनोखी साडी बाजारात एक असा कलाकार जो आपल्या अभिनयाच्या जीवावर आम्हाला हसवू किंवा रडवू शकतो.. मला आठवते जेव्हा आपण झी सिने स्टार की खोज मध्ये होतो तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात नेहमीच स्पर्धा होती की कोण चांगले नाचते. तुलाही माहिती आहे की मी नेहमीच एक सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. बरोबर ना अम्मू? हा झाला विनोदाचा भाग. काही दिवसांपूर्वी जेव्हा मी तुझ्या सिनेमाचं पोस्टर पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले….तुला तिथे पाहणं माझ्यासाठी स्वप्नासारखे होते आणि ज्या प्रकारे ते लॉंच केलं…..wooowwwwwwwww .. on that poster it wasn’t Amruta for me .. वाचा- कतरिना कैफ-विकी कौशलचं लग्नानंतर पहिलं व्हेकेशन,अभिनेत्याने शेअर केला PHOTO माझ्यासाठी ती अमृता नव्हती तर ती चंद्रमुखी होती. खरचं मला तुझा अभिमान वाटतो. तुझा प्रवास खऱंच आश्चर्यकारक आहे.एक अशी मुलगी ती एक चांगली बहीण तर आहेत पण एक चांगली मुलगी देखील आहे. शिवाय तू एक चांगली पत्नी, मैत्रीण आणि एक सच्चा कलाकार आहे. आणि हो ..तुला असं पाहून सगळ्यात जास्त कोणाला आनंद झाला असेल तर तो कांकूना….इंथ पर्यंत पोहचण्यासाठी तू खूप मेहनत केली आहे. मला तुला अशा चांगल्या, प्रतिभावन लोकांसोबत काम करताना पाहून खूप आनंद होतोय. या प्रत्येक यशासाठी पात्र आहेस. तुला यशाचा असा खूप लांब पल्ला गाठायचा आहे. आज तुझं गाणं रिलीज झालं आहे…..मला तुझ्यासोबत हे गाणं परफॉर्म करायचं आहे.
तुला आणि #chandramukhi च्या निर्मात्यांना खूप खूप खूप शुभेच्छा……मोठ्या पडद्यावर तुला पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे बेबी…व देव तुझ्या पाठिशी राहू दे. तू जशी आहेस तशीच राहा. खूप खूप प्रेम. २००४ पासूनची मैत्री मरेपर्यंत कायम राहिलं”, .लव्ह यू@amrutakhanvilkar #marathimulgi #jaimaharashtra #marathicinema Friends from 2004- till we die ❤️….अशी काही पोस्ट अंकिताने अमृताविषयी लिहिली आहे. वाचा- ‘खूप वर्षांनी गावी गेले होते’‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट अंकिताच्या या पोस्टवर अमृता खानविलकरनेही कमेंट केली आहे. “तू माझ्या बहिणीप्रमाणेच आहेस. या सुंदर पोस्टसाठी खूप खूप धन्यवाद”. दरम्यान अंकिताची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.