जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'खूप वर्षांनी गावी गेले होते..''माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीची इमोशनल पोस्ट VIRAL

'खूप वर्षांनी गावी गेले होते..''माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीची इमोशनल पोस्ट VIRAL

'खूप वर्षांनी गावी गेले होते..''माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीची इमोशनल पोस्ट VIRAL

अनेक लोक कामानिमित्त गावाबाहेर निघून गेलेले असतात. त्यामुळे त्यांना वर्षनुवर्षे आपल्या घरी आपल्या गावी जात येत नाही.असंच काहीसं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazya Navaryachi Bayako) फेम माया (Maya) अर्थातच अभिनेत्री रुचिरा जाधवसोबतसुद्धा (Ruchira Jadhav) घडलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च-  सर्वसामान्य माणूस असो किंवा कलाकार   (Actors)   प्रत्येकाची आपल्या मातीशी आपल्या गावाशी नाळ जोडलेली असते. आपल्या गावाबद्दल आपल्याला नेहमीच आपुलकी असते.अनेक लोक कामानिमित्त गावाबाहेर निघून गेलेले असतात. त्यामुळे त्यांना वर्षनुवर्षे आपल्या घरी आपल्या गावी जात येत नाही.असंच काहीसं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazya Navaryachi Bayako)  फेम माया  (Maya) अर्थातच अभिनेत्री रुचिरा जाधवसोबतसुद्धा (Ruchira Jadhav)  घडलं आहे. झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय ठरलेली मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही होय. ही मालिका सध्या बंद झाली असली, तरी या मालिकेतील कलाकार आजही सतत चर्चेत असतात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव होय. रुचिरा जाधवने मालिकेत माया ही भूमिका साकारली होती. गुरुनाथच्या बॉसची मुलगी आणि राधिकाच्या दुसऱ्या नवऱ्याची खास मैत्रीण अशी ही व्यक्तिरेखा होती. या मालिकेतून रुचिराला एक खास ओळख मिळाली होती. या मालिकेतील खलनायिका असूनसुद्धा रुचिराला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं. रुचिरा आपल्या कामानिमित्त सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. गेली अनेक वर्षे ती मुंबईत राहात आहे. ती मूळची चिपळूणची आहे. सतत कामात व्यग्र असल्याने फारसं कधी गावी जाणं होत नाही. आणि म्हणूनच अभिनेत्रीला आपल्या गावाची आठवण येत असते. यंदा मात्र अभिनेत्रीने वेळात वेळ काढून आपलं गाव गाठलं होतं. अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री रुचिरा जाधवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने चिपळूण जंक्शनवरील आपला एक फोटो शेअर करत आपल्या या भेटीबद्दल सांगितलं आहे. रुचिराने फोटो शेअर करत लिहिलं आहे, ‘‘खूप वर्षांनी गावी गेले होते. खूप वर्षांनी ट्रेनने प्रवास केला…. तेही एकटीने’. अभिनेत्री शिमग्यासाठी आपल्या गावी गेली होती. रुचिराने तिथे जाऊन अनेक सुंदर ठिकाणांना भेटीसुद्धा दिल्या आहेत. त्याचे काही व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात