JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / इंटेरिअर डिझायनरवर अभिनेत्रीचा छेडछाडीचा गंभीर आरोप, मुंबईत गुन्हा दाखल

इंटेरिअर डिझायनरवर अभिनेत्रीचा छेडछाडीचा गंभीर आरोप, मुंबईत गुन्हा दाखल

मुंबईत एका अभिनेत्रीने (Actress) तिच्याच घराचं इंटेरिअर डिझायनिंग (Interior designing) करणाऱ्या व्यक्तिवर छेडछाडीचे आरोप केले आहेत. अभिनेत्रीच्या या आरोपांनंतर पोलिसांनी त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात

फक्त राजस्थानच नव्हे तर अगदी दिल्लीपासून उत्तर प्रदेश, हरियाणा अशा बाहेरच्या राज्यातूनही या कामासाठी मुलींना बोलावलं जायचं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 17 ऑगस्ट : मुंबईत एका अभिनेत्रीने (Actress) तिच्याच घराचं इंटेरिअर डिझायनिंग (Interior designing) करणाऱ्या व्यक्तिवर छेडछाडीचे आरोप केले आहेत. अभिनेत्रीच्या या आरोपांनंतर पोलिसांनी त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील ओशीवारा पोलिस (Oshiwara police station) स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस आता त्या इंटेरिअर डिझायनरचा शोध घेत आहेत. दरम्यान ही एक साउथ अभिनेत्री (South actress) असल्याचं समजतं आहे. तर हे प्रकरण मागील महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात घडलं होतं. या अभिनेत्रीने वीरा देसाई, अंधेरी या भागात नवं घर खरेदी केलं होतं. तर घराचं इंटेरिअर डिझायनिंग करण्यासाठी तिने कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. 35 वर्षीय अभिनेत्रीने काम दिल्यानंतर मागील महिन्यात ती घराचं काम पाहण्यासाठी आली होती. मात्र त्याने केलेलं काम तिला पटलं नव्हतं, तेव्हा तिने हे कॉन्ट्रॅक्ट संपवायला सांगितलं होतं.

पुढे अभिनेत्रीने सांगितलं की, त्या डिझायनरने तिला अपशब्द बोलायला सुरूवात केली. तर तिला तिच्याच घरातून बाहेर काढलं. तर तिने असंही सांगितलं की, तिला त्या व्यक्तिने पोलिसांत जाण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच तक्रार दाखल करण्यासाठी उशीर झाला आहे.

B’day Spl: कधीकाळी B- ग्रेड चित्रपटांत काम करायची तारक मेहताची दयाबेन; पाहा अभिनेत्रीचा यशस्वी प्रवास

दरम्यान या प्रकरणी आता पोलिस आता त्या इंटेरिअर डिझायनरचा शोध घेत आहेत. ओशिवारा पोलीस स्थानकात अभिनेत्री अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर आईपीसी कलम 354, 504, 509 या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस आता या प्रकरणाचा तापस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या