JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोरोना काळात बिग बींची मोठी खरेदी; मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर

कोरोना काळात बिग बींची मोठी खरेदी; मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर

अमिताभ बच्चन यांनी मुंबईत आणखी एक महागडं घर खरेदी केली आहे. या घराची किंमत ऐकून तुम्हाला येईल चक्कर

जाहिरात

Amitabh Bachchan

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 मे : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) हे त्यांच्या कामासाठी, अभिनयासाठी जितके प्रसिद्ध आहेत तितकेच ते त्यांच्या प्रॉपर्टीसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मुंबईतील अलिशान अशा ‘जलसा’ बंगल्याची अनेकदा चर्चा होते. बिग बींची प्रॉपर्टी या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. तर आता त्यांनी मुंबईत महागड असं डुप्लेक्स घर खरेदी केलं आहे. व त्याची किंमतही चक्रावून टाकणारी आहे. मुंबईतील अंधेरी या ठिकाणी एक अलिशान घर त्यांनी खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे हे डुप्लेक्स अपार्टमेंट आहे. 5184 स्के. फु. हे अपार्टमेंट आहे.

सावरकरांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर; महेश मांजरेकर करणार बायोपिकचं दिग्दर्शन

27 आणि 28 मजल्यावर हे अलिशान अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटला 6 कार पार्किंग स्पेस आहे. वृत्तानुसार या घराचं अद्याप बांधकाम सुरू असून लवकरच बिग बींना याचा ताबा मिळणार आहे. अमिताभ यांच संपूर्ण कुटुंब सध्या जलसा या जुहू येथील अलिशान बंगल्यात राहतं. (Amitabh Bacchan bought expensive property in Mumbai)

या नव्या कोऱ्या अपार्टमेंटसाठी बिग बींनी 31 करोड रुपये मोजले असल्याची माहिती मिळत आहे. होय इतकी मोठी रक्कम त्यांनी या डुप्लेक्स अपार्टमेंटसाठी मोजली आहे. पिंकविला ने दिलेल्या वृत्तानुसार हे अतिशय असं अलिशान घर असणार आहे. मागिल वर्षी डिसेंबर महिन्यातच या घराच डिल करण्यात आलं होतं.

दुसरीकडे मागील महिन्यात एप्रिल महिन्यात अमिताभ यांच्या या घराची नोंदणी झाली होती. तर या आधी त्यांनी 62 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या प्रॉपर्टी स्टॅम्प ड्युटीवरील 2% सुटीचा फायदा बिग बींनी करून घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र सरकराने 31 डिसेंबर 2020 च्या आतील नव्या घरांवरील स्टॅम्प ड्युटीवर 2% सुट दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या