JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Alia Bhatt Pregnancy : आलियाने बदललेल्या Instagram DP ची चर्चा; हाच तो क्षण ज्या वेळी रणबीरने केलं होतं प्रपोज

Alia Bhatt Pregnancy : आलियाने बदललेल्या Instagram DP ची चर्चा; हाच तो क्षण ज्या वेळी रणबीरने केलं होतं प्रपोज

आलियाने आपल्या इन्स्टाग्रामचा प्रोफाईल फोटो (Alia Bhatt Instagram) बदलला. सध्या या फोटोची चर्चा आहे. कारण हाच तो रोमँटिक क्षण आहे. रणबीरच्या हातातली एक खास गोष्ट दिसतेय का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी सोमवारी (27 जून 22) रोजी आपल्या प्रेग्नन्सीची बातमी जाहीर केली. यानंतर काही तासांमध्येच आलियाने आपल्या इन्स्टाग्रामचा प्रोफाईल फोटो (Alia Bhatt Instagram) बदलला. तिनं आपला आणि रणबीरचा एक फोटो प्रोफाईलला ठेवला आहे, ज्याला तिने “फेव्हरेट पिक्चर’ म्हटलं आहे. हा फोटो विशेष असण्याचं कारण म्हणजे, रणबीरने आलियाला जेव्हा प्रपोज (Ranbir Kapoor Proposes Alia Bhatt) केलं होतं, त्या क्षणाचा हा फोटो आहे. रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी हा फोटो शेअर केला आहे. रणबीरची आई नीतू कपूर यांनी या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्यांनी ‘गॉड ब्लेस’ असं कॅप्शन दिलेलं आहे. आलियाने या फोटोच्या कमेंटमध्ये ‘माय फेव्हरेट पिक्चर’ (Alia Bhatt favourite picture) असं म्हटलं आहे. सोबतच तिनं भरपूर हार्ट इमोजी टाकल्या आहेत.या फोटोची खासियत म्हणजे, रणबीरने आलियाला ज्या क्षणी प्रपोज केलं होतं त्या क्षणाचा हा फोटो आहे. आलिया आणि रणबीर दोघं एका व्हेकेशन ट्रिपवर असताना रणबीरने आलियाला प्रपोज केलं होतं. या फोटोमध्ये हे दोघं लव्हबर्ड्स एकमेकांच्या मिठीत आहेत. नीट पाहिल्यास रणबीरच्या हातात एक रिंग बॉक्सही (Ranbir Kapoor carrying ring box to propose Alia) दिसत आहे. त्यामुळे या दोघांनी सांगितलं नसलं, तरीही हा फोटो प्रपोज करतानाच्या क्षणाचा आहे, हे फॅन्सनी ओळखलं आहे. नितू यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आलियाने आपला अल्ट्रासाउंड रूममधील फोटो शेअर करत प्रेग्नन्सीची माहिती (Alia Bhatt announces pregnancy) सर्वांना दिली होती. “अवर बेबी.. कमिंग सून” असं कॅप्शन तिनं आपल्या फोटोला दिलं होतं. हेही वाचा - Alia Bhatt pregnancy: आलियाच्या गुड न्यूजनंतर कंडोम कंपनीची अफलातून पोस्ट VIRAL! या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीरही होता. यानंतर काही वेळातच या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. आलियाची आई सोनी राझदान (Soni Razdan), सासू नीतू कपूर, वहिनी रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) या सर्वांनी आपापल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून त्यांना शुभेच्छा दिल्या. आलियाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आपला आनंद व्यक्त केला. “माझ्या बाळाला आता बाळ होणार आहे, रणबीर आणि आलियासाठी मी खूप खूश आहे. माझं कुटुंब मोठं होत आहे, आणि मला आता आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या भूमिकेसाठी – आजोबा होण्यासाठी - तयार व्हायचं आहे. हा एक ग्रँड डेब्यू असेल!” अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रणबीर आणि आलियानं  या वर्षीच्या एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली होती. यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत प्रेग्नन्सीची घोषणा केल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत मीम्स शेअर केले जात आहेत. ‘वर्षाच्या आत पाळणा हलवण्याची परंपरा कायम ठेवली’ अशा मिश्किल पोस्टमधून लोक या दाम्पत्याला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, या दोघांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) सिनेमा हा 9 सप्टेंबर 22 रोजी रिलीज होणार असून या निमित्ताने आलिया-रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या