JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Alia Ranbir Daughter : आलिया रणबीर अशी घेतायेत लेकीची काळजी; कोणाचीही मदत घेण्यास नकार

Alia Ranbir Daughter : आलिया रणबीर अशी घेतायेत लेकीची काळजी; कोणाचीही मदत घेण्यास नकार

आलिया आणि रणबीरची लेक सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. या दोघांच्या मुलीविषयी अजून एक माहिती समोर येत आहे.

जाहिरात

आलिया भट्ट-रणबीर कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 नोव्हेंबर : आलिया भट्टने 6 नोव्हेंबरला एका मुलीला जन्म दिला. आई-वडील झाल्यानंतर आलिया आणि रणबीर च्या आनंदाला पारावार उरला नाही. संपूर्ण कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. घरात लहान परी आल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. आता कपूर कुटुंबाच्या या  लिटिल प्रिन्सेसच्या साठी आलिया रणबीरसह सगळेच तैनातीत आहेत. या दोघांनी नुकतंच लेकीचं बारसं करत तिच्या नावाची घोषणा केली. कपूर घराण्याच्या परंपरेप्रमाणे या चिमुकलीचं  नाव ‘र’ या अक्षरावरून ‘राहा’ असं ठेवण्यात आलं आहे. आलियाने पोस्ट शेअर करत या नावाचे सगळ्या भाषेतील अर्थ सांगितले होते. आता चाहत्यांमध्ये याचीच चर्चा असताना या दोघांच्या मुलीविषयी अजून एक माहिती समोर येत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी एखाद्या दाईची मदत घेतात. त्यांच्या भरवश्यावर मुलांना ठेवतात. करीना कपूरचा लेक तैमूरसोबत कायम त्यांची दाई असते. पण ताज्या माहितीनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कोणाचीही मदत न घेता आई वडिलांचं कर्तव्य पार पाडत आहेत. या नवीन पालकांनी त्यांची मुलगी राहाची काळजी घेण्यासाठी कोणतीही दाई भाड्याने घेतली नाही आणि ते स्वतःच सर्वकाही करत आहेत. हेही वाचा - Drishyam 2 च्या बंपर यशानंतर लवकरच येणार ‘दृश्यम 3’; दिग्दर्शकानं दिली मोठी हिंट या जोडप्याच्या जवळच्या सूत्रानुसार, “मुलीच्या आजी  नीतू आणि सोनी बाळासाठी आणि पालकांसाठी कायम उपलब्ध आहेत, परंतु आलिया आणि रणबीर बाळाची सर्व कामे स्वतः करत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीरने कबूल केल्याप्रमाणे, तो बाळाशी निगडित सर्व गोष्टी  शिकत आहे आणि त्याला त्याच्या मुलींसाठी सर्वात चांगला बाबा बनायचं आहे. रणबीर बाळाच्या आईप्रमाणेच सर्व कामे करत आहे. रणबीर आणि आलिया सध्याच्या सर्वात बेस्ट पालकांपैकी एक आहेत." अशी माहिती सूत्राने दिली आहे.

संबंधित बातम्या

नुकतीच  24 नोव्हेंबर 2022 रोजी, आलिया भट्टने तिच्या मुलीची पहिली झलक शेअर केली आणि तिचे नाव सांगितले.  या फोटोमध्ये, मुलीचे वडील रणबीर कपूरच्या हातात  बाळाला धरून ठेवलेले आहे  तर आलिया त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहे. लहान मुलाच्या बार्सिलोना जर्सीवर ‘राहा’ असे नाव लिहिलेला असा फोटो आलियाने शेआर केला होता. फोटोसोबत आलियाने शेअर केले होते की तिच्या मुलीचे हे नाव तिची आजी नीतू कपूर यांनी ठेवले आहे.

आलिया आणि रणबीरने  प्रायव्हसी लक्षात घेऊन बाळाला भेटणाऱ्या आणि फोटो काढणाऱ्यांसाठी काही नियम केले आहेत. त्यांचे हे प्रयत्न बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. त्यांची खूपच चर्चा झाली. आता आलिया आणि रणबीरचं बाळाची काळजी स्वतः घेण्याचं हे पाऊल  कौतुकास्पद आहे. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच रॉकी और राणी की प्रेम कहानीमध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. याशिवाय ती लवकरच हॉलिवूड पदार्पणही करणर आहे. हार्ट ऑफ स्टोनमधून ती हॉलिवूडमध्ये अभिनयाची जादू दाखवायला सज्ज झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या