JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बापरे! सनी लियोनीशी कोणी केली अशी मस्ती? पाहून तुम्हीही खळखळून हसाल

बापरे! सनी लियोनीशी कोणी केली अशी मस्ती? पाहून तुम्हीही खळखळून हसाल

सनीची या व्यक्तिने मस्करी केली. पण आता सनी त्याचा बदला घेणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 जून: अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) ही चित्रपटांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांमध्येही फार सक्रिय असते. एम टीव्ही (MTV) वरील तिच्या शोचं ती सध्या शुट करतेय. याशिवाय ती सोशल मीडिया वर फार सक्रिय दिसते. अनेक व्हिडीओस ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना फार आवडत आहे. ज्यात तिची मस्करी केली जात आहे. सनी तिच्या चाहत्यांच्या फार संपर्कात असते. तिच्या कामाची अनेक माहिती तसेच पडद्यामागील क्षण हे ती पोस्ट करत असते. या व्हिडीओत ‘स्प्लिट्सविला’ (Splitsvilla) या तिच्या शोचं शुटींग सुरू असतानाचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. ज्यात ती सिन साठी तयार असते. पण इतक्यातच तिच्या कानात कोणीतरी गुगली करतं. यामुळे सनी एकदम चकीत होऊन रियॅक्शन देते. व हसू लागते. व त्यानंतर सगळेच हसू लागतात.

सनी सोबत मस्ती करणारा हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून सनीचा मॅनेजरच होता. सनी रजनी असं त्याचं नाव आहे. (Sunny posted funny video) सनीला असे मजेशीर व्हिडीओ आवडतात. ती नेहमीच अशा प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करत असते. यावर तिला अनेक कमेंट्सही मिळतात.

संबंधित बातम्या

या व्हिडीओवर देखिल सनीला अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. तसेच तिने कॅप्शन मध्ये याचा बदला घेतला जाईल असं लिहीलं आहे. या शो मध्ये ती होस्ट रणविजय सिंग याच्यासोबत दिसत आहे. ते दोघे हा शो अनेक वर्षांपासून होस्ट करतात.

HBD : बॉलिवूडची पहिली Bikini Girl; पाहा बेधडक नुतन यांचा थक्क करणार प्रवास

सनी सध्या तिच्या शुटींगचे अनेक व्हिडीओ पोस्ट करताना दिसतेय. मागे तिला ड्रेस परिधान करण्यासाठी अनेक लोकांनी कसे परिश्रम घेतले हा व्हिडीओ तिने पोस्ट केला होता. यामुळे सनी नेहमीच चर्चेत राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या