JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप उरकलं लग्न? 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप उरकलं लग्न? 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण

लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश असलेली रश्मिका गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  अशातच या दोघांचा चक्क लग्नाचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

जाहिरात

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 नोव्हेंबर : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना   सतत चर्चेत असतात. दोघांनी आतापर्यंत ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात सोबत काम केलेलं आहे. दोन्ही चित्रपटांमधील त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश असलेली रश्मिका गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  ते अनेकदा सोबत फिरताना दिसले आहेत. त्यामुळे चाहते त्यांना ‘कपल’च समजत आहेत. दोघेही मुंबईमध्ये स्पॉट झाले होते. तर काही दिवसांपूर्वीच मालदीवला एकत्र सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या  चर्चां होत आहेत. अशातच या दोघांचा चक्क लग्नाचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर रश्मिका मंदान्ना आणि विजय देवराकोंडा यांचा वधू -वराच्या रूपात सजलेला फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांच्या एका चाहत्याने एडिट केला असला तरी चाहते त्यांच्या लग्नाची कल्पना करू लागले आहे. या फोटोत रश्मीने सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात सुंदर दिसतीये  तर विजय पांढऱ्या रंगाची शेरवानी घातलेला दिसत आहे. या फोटोमध्ये दोघांना पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. हेही वाचा - Bholaa Teaser Out: कपाळावर भस्म अन हातात भगवद्गीता; ‘भोला’ मध्ये अजय देवगणचा एकदम कडक अंदाज! रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही दोन साऊथ इंडस्ट्रीमधील मोठी नवे आहेत. या दोघांनीही फारच कमी वेळात तुफान लोकप्रियता मिळाली आहे. या दोघांनी फक्त साऊथमध्येच नव्हे तर जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. रश्मिका आणि विजयची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ पाडते. विजय आणि रश्मिका नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं जाहीर करतात. परंतु अशा काही गोष्टी समोर येतात की त्यामुळे हे दोघे खरंच रिलेशनशिपमध्ये असल्याची शंका चाहत्यांना येऊ लागते.

दरम्यान या सर्व चर्चांवर आता रश्मिका मंदानाने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत रश्मिकाला विजय सोबतच्या अफेअरच्या  अफांवर आपल्याला कसं वाटतं असं विचारलं होत. तेव्हा यावर रश्मिका म्हणाली होती कि, ‘हो या अफवा आहेत. मी आणि विजयने करिअरच्या सुरुवातीला एकत्र काम केलं आहे. आणि ते लोकांना प्रचंड पसंत पडलं. त्या काळात आम्हाला इंडस्ट्री काहीही माहित नव्हती. त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांच्या मिळत्याजुळत्या व्यक्तीसोबत काम करायला मिळालं तर त्यांच्यात आपोआप मैत्री होते. तेच आमच्यात झालं आहे’. या दोघांविषयी रश्मिका पुढे म्हणाली होती कि, ‘‘विजय आणि मी चांगले मित्र आहोत. आमच्या दोघांचे हैद्राबादमध्ये अनेक कॉमन फ्रेंड आहेत. खरं तर आमची गॅंगच आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांशी जोडलेली आहोत. आणि हे सगळं खूप गोड आहे. जेव्हा सगळं जग रश्मिका आणि विजयसारखं आहे तेव्हा सर्व खरंच खूप गोंडस वाटतं.’’ आता या दोघांचं  नातं नेमकं कसं आहे ते येणाऱ्या काळातच कळेल. मात्र सध्या तरी एडिट केलेल्या फोटोमुळे का होईना चाहते मात्र आनंदात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या