मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rashmika Mandanna: विजयसोबतच्या नात्याबाबत विचारताच हे काय बोलून गेली रश्मिका? पुन्हा चर्चांना उधाण

Rashmika Mandanna: विजयसोबतच्या नात्याबाबत विचारताच हे काय बोलून गेली रश्मिका? पुन्हा चर्चांना उधाण

रश्मिका-विजय

रश्मिका-विजय

साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाला 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखलं जातं. आज ही अभिनेत्री फक्त देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाली आहे. आपल्या 'पुष्पा' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1 ऑक्टोबर-  साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाला 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखलं जातं. आज ही अभिनेत्री फक्त देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाली आहे. आपल्या 'पुष्पा' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. 'गीता गोविंदा' आणि 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटातून रश्मिका पहिल्यांदा चर्चेत आली होती. या दोन्ही चित्रपटांनी तिला देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली होती. फक्त रश्मिकाच नव्हे तर विजय देवरकोंडासुद्धा प्रसिद्धीत आला होता. या चित्रपटातून त्यांची केमिस्ट्री तुफान गाजली होती. या चित्रपटांनंतर रश्मिका आणि विजय खऱ्या आयुष्यातसुद्धा एकमेकांच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जातं. आता याबाबत रश्मिका ने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही दोन साऊथ इंडस्ट्रीमधील मोठी नवे आहेत. या दोघांनीही फारच कमी वेळात तुफान लोकप्रियता मिळाली आहे. या दोघांनी फक्त साऊथमध्येच नव्हे तर जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. रश्मिका आणि विजयची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ पाडते. फक्त पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातसुद्धा या दोघांची जोडी पाहायला चाहते उत्सुक आहेत. अनेकांना ते दोघे परफेक्ट कपल वाटतात. इंडस्ट्रीमध्ये सतत या दोघांच्या अफेयर्सच्या चर्चा होत असतात.

(हे वाचा: janhavi Kapoor: 5 वर्षानंतर जान्हवी कपूर पोहोचली त्याच मंदिरात; काय आहे खास कनेक्शन? )

विजय आणि रश्मिका नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं जाहीर करतात. परंतु अशा काही गोष्टी समोर येतात की त्यामुळे हे दोघे खरंच रिलेशनशिपमध्ये असल्याची शंका चाहत्यांना येऊ लागते. नुकतंच विजय देवरकोंडाने 'लायगर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. लवकरच रश्मिका मंदानाही 'गुड बाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. दोघांनी एकाच वेळी बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळल्याने पुन्हा त्यांच्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान या सर्व चर्चांवर आता रश्मिका मंदानाने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. पिंकव्हीलाने नुकतंच याबाबतचा रिपोर्ट शेअर केला आहे. या सर्व अफांवर आपल्याला कसं वाटतं यावर रश्मिका म्हणाली, 'हे सर्व खूप गोंडस आहे.. मीसुद्धा खूप गोंडस आहे, अगदी अय्यो बाबूसारखी'. या सर्व अफवा आहेत की खरंच तुमच्यामध्ये काही आहे? असं विचारलं असतं रश्मिका म्हणाली, 'हो या अफवा आहेत. मी आणि विजयने करिअरच्या सुरुवातीला एकत्र काम केलं आहे. आणि ते लोकांना प्रचंड पसंत पडलं. त्या काळात आम्हाला इंडस्ट्री काहीही माहित नव्हती. त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांच्या मिळत्याजुळत्या व्यक्तीसोबत काम करायला मिळालं तर त्यांच्यात आपोआप मैत्री होते. तेच आमच्यात झालं आहे'.

विजय आणि मी चांगले मित्र आहोत. आमच्या दोघांचे हैद्राबादमध्ये अनेककॉमन फ्रेंड आहेत. खरं तर आमची गॅंगच आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांशी जोडलेली आहोत. आणि हे सगळं खूप गोड आहे. जेव्हा सगळं जग रश्मिका आणि विजयसारखं आहे तेव्हा सर्व खरंच खूप गोंडस वाटतं'.

First published:

Tags: Entertainment, Rashmika mandanna, Vijay deverakonda