मुंबई 9 जुलै : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) काही महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा आईबाबा झाले. पण दुसऱ्या मुलाला त्यांनी त्यांच्या चाहत्यांपासून ही दूरच ठेवलं आहे. तर अद्यापही त्याचा चेहरा दाखवण्यात आला नाही. तर त्याचं नावही जाहीर करण्यात आलं नाही. मात्र आता त्याचं नाव ठेवलं असल्याचं समोर येत आहे. करीना पहिल्यांदा आई झाली होती तेव्हा तिने ती गर्भवती असल्यापासून ते मुलाला जन्म देईपर्यंत अनेकदा न्यूज मध्ये होती. पहिला मुलगा म्हणजेच तैमूरचा (Taimur) जन्म झाल्या झाल्या तिने सोशल मीडिया वर त्याचा आणि तिचा फोटो शेअर केला होता. व त्यानंतर तैमूर नेहमीच मीडियाचा चर्चेचा विषय ठरला. पण यावेळी मात्र करीनाने दुसऱ्या मुलाला फारच गोपनीय ठेवलं आहे.
इंडिया टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार करीनाने दुसऱ्या मुलाचं नामकरण केलं आहे. तिने त्याला ‘जेह’ (Jeh) हे नाव दिलं आहे. सध्या तरी करीना आणि सैफ त्याला जेह म्हणत असले तरीही हेच नाव अधिकृत असणार का हे स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान जेह हे एका निळ्या रंगाच्या पक्षाचं नाव आहे.
याशिवाय आणखी एका नावाची देखील चर्चा आहे की सैफ अली खान ला त्याच्या मुलाचं नाव हे त्याच्या वडिलांच्या आठवणीत त्याचंच नाव ठेवायचं आहे. म्हणजेच मन्सूर अली खान पतौडी (Mansoor Ali Khan) असं नाव त्याला ठेवायचं आहे.
Hot मलायकाचा Monochrome अवतार; 25 वर्षांपूर्वी या फोटोंनी उडवली होती खळबळकरीनाने पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानंतर तिच्यावर बरीच टीकाही झाली होती (Kareena Kapoor Khan baby name). त्यामुळे आता करीना कोणत नाव ठेवणार याकडे तिच्या चाहत्यांच लक्ष लागलं आहे.