JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Free Covid help: सोनू सूदचं नवं मिशन; गरजवंतांना देणार घरपोच सेवा

Free Covid help: सोनू सूदचं नवं मिशन; गरजवंतांना देणार घरपोच सेवा

‘तुम्ही आराम करा, मला टेस्ट करू द्या’, ‘फ्री कोव्हिड हेल्प’ (Free covid help) असं या मिशनचं नाव असून ही सेवा घरपोच असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 एप्रिल : कोरोनाची परिस्थिती (corona pandemic) देशभरात ही हालाखिची होत चालली आहे. अनेक जन या कठीण काळात मदतीसाठी पुढे येत आहेत पण अभिनेता सोनु सूद (Sonu Sood)  हा गेल्या वर्षभरापासून न थांबता लोकांची मदत करत आहे. एक देवदूत बनून त्याने कार्य करण्याचं मनावर घेतलं आहे. रोज तो नव्या पद्धतीने लोकांची मदत करताना दिसत आहे. तर आता ते एक नवी योजना घेऊन लोकांसमोर आला आहे. ‘फ्री कोव्हिड हेल्प’ (Free covid help) असं या मिशनचं नाव असून ही सेवा घरपोच असणार आहे. सोनूने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. Healwell24 आणि Krsnaa Diagnostics Pvt. Ltd. यांच्या सहयोगाने सोनूने ही नवी योजना सुरु केली आहे. ‘फ्री कोव्हिड हेल्प’ असं या योजनेचं नाव आहे. ‘तुम्ही आराम करा, मला टेस्ट करू द्या असं ट्विट त्याने केल त्यासोबतच या योजनेची आणखी माहिती दिली. या मार्फत लोकांना घरबसल्या कोरोना टेस्ट करता येणार आहे. याशिवाय घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला मिळणार असून त्यासाठी एक टोल फ्री नंबर दिला आहे. त्यावर फोन केल्यानंतर डॉक्टर कन्सलटेशन देणार आहेत.

याशिवाय सोनूची रोजच निरनिराळ्या प्रकारची मदत पहायला मिळते. सोनू ने टेलिग्राम वर एक ग्रुप बनवला असून यामार्फत तो बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, औषध याची माहिती पुरवत आहे. सोशल मीडियावर याविषयी माहिती देत त्याने या ग्रुप मध्ये जॉइन होण्याचं आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या

’ आता संपूर्ण देश एकत्र येणार आहे. माझ्यासोबत टेलिग्राम चॅनेलवर पे इंडिया फाईट्स विथ कोविड हे अकाऊंट सुरू केले आहे. त्यात सहभागी व्हा आणि देशाला वाचवा. असं ट्विट त्याने केलं होत.

बॉलिवूड कलाकारांनी दिला मदतीचा हात; कोरोना रुग्णांसाठी केलं कोट्यवधींचं दान

सोनू ने नुकतच आणखी एक ट्विट करत आपल्याला खुप सारे मेसेजेस येत असल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात सोनू ला प्रत्येक सेकंदाला मेसेज येत असल्याचं दिसत आहे.

जाहिरात

तर आपण प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. पण सगळ्यापर्यत पोहोचताना उशीर होत असल्याने त्याने दिलगीरी ही ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या