JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘असा मेसेज दिसल्यास व्हा सावध’; सोनू सूदनं चाहत्यांना केलं सतर्कतेचं आवाहन

‘असा मेसेज दिसल्यास व्हा सावध’; सोनू सूदनं चाहत्यांना केलं सतर्कतेचं आवाहन

सोनूने स्वतः याबाबत सोशल मीडियावर याबाबत माहिती देऊन अशा समाज कंटकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 17 मे: अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या 1 ते दीड वर्षापासून सातत्याने लोकांची मदत करत आहे. आजवर अनेक गरजूंना त्याने त्याच्या परीने जमेल तशी मदत केली आहे. तर सुरूवातीला मजूरांना घरी सोडवण्यापासून त्याने सुरुवात केली होती. व त्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणावर हे कार्य अविरत सुरू ठेवलं. पण आता काहीजन त्याच्या नावाचा वापर करून पैसे उकळण्याचे धंदे करत आहेत. सोनूने स्वतः याबाबत सोशल मीडियावर याबाबत माहिती देऊन अशा समाज कंटकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सोनूने स्वखर्चातून मजूरांना आपल्या घरी जाण्याची सोय मागील वर्षी लॉकडाउन मध्ये केली होती. पण सोनूचं हे काम पाहून अनेकांना त्यातून प्रेरणा मिळाली व सोनू ने त्याच्या संस्थे मार्फत (Sonu Sood Foundation) आणखीही काही सामाजिक कार्य करायला सुरू केली.

हे वाचा - ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम मीरा आहे fitness freak; पाहा मोमोच्या मादक अदा

तर आता सोनू सूद हा कोरोनाग्रस्तांना दिवस रात्र सेवा देत आहे. यात त्याला अनेक संस्थांनी ही सपोर्ट करायला सुरूवात केली. पण यातील कोणत्याही मदती साठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही असं त्याने वेळोवेळी सांगितलं आहे. पण त्याच्या नावाचा अनेकजन गैरफायदा घेत असल्याचं समेर आलं आहे.

संबंधित बातम्या

सोनूने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत सोनूचं नाव आणि फोटो वापरून त्यावर पैसे दान करण्याचं आवाहान केलं आहे. तर त्यावर एक नंबर देखिल देण्यात आला आहे. व त्या नंबरवर पैसे पाठवण्यासाठी आवाहन केलं आहे. पण सोनूने हा फोटो पोस्ट करत हे फेक (Fake posts) असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सोनूच्या नावाचा गैरवापर केला जात आहे हे समोर येत आहे. तेव्हा अशा धोकेबाजांपासून सावध साहणं गरजेच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या