JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अकेले हम अकेले तुम' आमिरच्या भावाचाही झाला घटस्फोट; पत्नीने केले होते हिंसाचाराचे आरोप

'अकेले हम अकेले तुम' आमिरच्या भावाचाही झाला घटस्फोट; पत्नीने केले होते हिंसाचाराचे आरोप

हैदरची पत्नी इव्हा ही छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमधून तिने काम केलं आहे. तर काही चित्रपटांतही ती दिसली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 जुलै : अभिनेता आमिर खानचा (Amir Khan) भाऊ हैदर अली (Haider Ali Khan) आणि पत्नी इव्हा ग्रोव्हर (Eva Grover) सोबत घटस्फोट झाला होता. इव्हा ही छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमधून तिने काम केलं आहे. तर काही चित्रपटांतही ती दिसली होती. हैदर अली हा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ताहीर हुसेन (Tahir Hussain) यांचा लहान मुलगा आहे. तर अभिनेता आमिर खानचा लहान सावत्र भाऊ आहे. हैदरने ‘दिल तो दीवाना है’ फिल्म मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हैदर आणि इव्हाने प्रेमविवाह केला होता.

अखेर तैमूरच्या भावाच झालं बारसं; वाचा काय आहे करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव

इव्हा आणि हैदर यांच्या विवाहानंतर त्यांना एक मुलगी देखील आहे. पण लग्नाच्या अखी वर्षांनंतरच त्यांच्यात कलह सुरू झाला. व या कलहाच रूपांतर घरगुती हिंसेत झालं. इव्हाने त्यांचं लग्नं वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता पण ते शक्य झालं नाही. इव्हाने हैदर वर घरगुती हिंसेचे आरोप लावल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. टीव्ही अभिनेत्रीने केलेल्या या आरोपांमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

इव्हाने इंडिया फोरम ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल होत की 2008 साली त्यांनी घटस्फोट घेतला. हा खूप कठीण प्रसंग होता पण रोजच्या हिंसेपासून सुटकारा हवा होता. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

आमिर-किरण घटस्फोटानंतर काय करतायेत? आवड्याभरातच दुसऱ्यांदा दिसले एकत्र, कारण…

इव्हाने फेमस शो ‘ऑफिस-ऑफिस’ (Office -Office) आणि ‘माय फ्रेंड गणेशा’ (My friend Ganesha) यामध्येही काम केलं आहे. इनटॉलरेंसच्या मुद्यावर जेव्हा आमिर खानने विवादस्पद वक्तव्य केलं होतं तेव्हा हैदर त्याच्या मदतीला आला होता. तेव्हाही हैदरवर टीका झाली होती. नुकताच अभिनेता आमिर खान पत्नी किरन राव यांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे हैदर देखील चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या