जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आमिर-किरण घटस्फोटानंतर काय करतायेत? आवड्याभरातच दुसऱ्यांदा दिसले एकत्र, कारण...

आमिर-किरण घटस्फोटानंतर काय करतायेत? आवड्याभरातच दुसऱ्यांदा दिसले एकत्र, कारण...

आमिर-किरण घटस्फोटानंतर काय करतायेत? आवड्याभरातच दुसऱ्यांदा दिसले एकत्र, कारण...

आमिर आणि किरणने एकमेकांच्या सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण असं असलं तरीही ते पूर्वीप्रमाणेच एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 10 जुलै : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांचा काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच आठवडाभरावपूर्वीच घटस्फोट झाला आहे. एकमेकांच्या सहमतीने त्यांनी हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण असं असलं तरीही ते पूर्वीप्रमाणेच एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. व त्यांच्या नात्यात कोणतीही कटुता नसल्याचं दिसत आहे. दरम्यान हा फोटो अभिनेता आमिर खानच्या आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्डा’च्या (Lal Singh Chadda) सेटवरचा आहे. जिथे किरण आणि आमिर एकत्र वेळ घालवत आहेत. साउथ अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) याने हा फोटो शेअर केला आहे. सध्या लाल सिगं चड्डाचं शुटींग हे लडाखमध्ये सुरू आहे. तर चित्रपटाची स्टारकास्ट लडाखमध्ये आहे. त्यावेळी आमिर आणि किरणही एत्र वेळ घालवताना दिसले.

जाहिरात

फोटो शेअर करत चैतन्यने लिहिलं की, ‘कृतज्ञ आहे’ दरम्यान चैत्यन्यला चित्रपटात विजय सेतुपतीच्या जागेवर घेण्यात आलं आहे. जो चित्रपटात आमिर खानच्या जवळच्या मित्राची भूमिका साकरणार आहे.

‘लाल सिंग चड्डा’ हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंपचा’ हिंदी रिमेक आहे. चैतन्य चित्रपटात बेंजामिन बुफोर्ड ब्लू उर्फ ​​बुब्बा हे पात्र साकारणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार लाल सिंग चड्डाची टिम सध्या लडाखमध्ये महत्तपूर्ण फायटींग सीन शुट करत आहे. हे संपूर्ण 45 दिवसांचं शेड्युल्ड शुटींग आहे.

अखेर तैमूरच्या भावाच झालं बारसं; वाचा काय आहे करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव

काहीच दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेणारे आमिर खान आणि किऱण रावला एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. दोघेही घटस्फोट झाल्यानंतर काहीच तासांत लाइव्ह देखील आले होते. व आपण विभक्त झालो असलो तरीही मैत्री संपणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात