मुंबई, 06 जून: लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. मालिकेच्या प्रत्येक भागाची अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. मालिकेतील अरुंधती आणि आशुतोषची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच हिट झाली आहे. आई कुठे काय करते मालिका सध्या चांगल्या ट्रॅकवर सुरू आहे. ईशा आणि अनिशचा साखरपुडा झाल्यापासून मालिकेत चांगल्या गोष्टी पाहायला मिळत आहे. अरुंधती आणि आशुतोष दोघेही आता संसाराला लागले आहेत. असं असताना मधले काही दिवस अरुंधती मालिकेतून गायब झाली होती. तिला चाहते मिस करत होते. अशातच आता अरुंधती लवकरच मालिकेत परतणार आहे. मालिकेच्या अपडेट नुकतीच समोर आली आहे. गेल्या काही दिवसात अरुंधतीने मालिकेतून एक्झिट घेतली होती. याचं कारण म्हणजे अरुंधती वर्ल्ड टूरवर गेली होती. जगातील प्रतिष्ठीत शहरातील, प्रतिष्ठीत मंचावर अरुंधती गाणं गाणार होती. मालिकेतील अरुंधती वर्ल्ड टूरवर गेलेली दाखवलं तरी प्रत्यक्षात अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर लेकीबरोबर सुट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलिया ट्रिपवर गेली होती. मधुराणीनं सध्या मालिकेतून सुट्टी घेतल्यानं मालिकेतील अरुंधती देखील विदेशात गेल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता मात्र मधुराणीने मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली असून लवकरच मालिकेतील अरुंधती प्रेक्षकांना पुन्हा दिसणार आहे.
अखेर अरुंधती अचानक केळकरांच्या घरी येऊन सगळ्यांना आश्चर्यचकीत करणार आहे. मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यानुसार, ‘सुरुवातीला अनिश आणि सुलेखा ताईं अरुंधतीला पाहतात. तिला पाहताच त्यांना धक्काच बसतो. ती दिसताच दोघेही अरुंधतीचं नाव घेतात. त्यानंतर वीणा सुद्धा अरुंधतीला पाहते. ती देखील आश्चर्याने तिचं नाव घेते. हे सगळेच अरुंधतीच्या नावानंआपल्याला चिडवत आहेत असं वाटून अनिरुद्ध त्यांना ओरडतो. Shreyas Talpade: जेव्हा कॅमेरामन म्हणाला ‘पनौती है ये…’ ; संघर्षाच्या काळातील ते दिवस आठवून श्रेयस भावुक मात्र जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा खरंच अरुंधती त्याच्यासमोर उभी असते. दोघेही एकमेकांना पाहून इमोशनल होतात. अरुंधतीला अचानक समोर पाहून आशुतोषला सुखद धक्का बसतो. अंडी तो सगळं विसरून थेट तिला मिठी मारतो. हे पाहून घरातले देखील आश्चर्यचकित होतात.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचं नवं कथानक सध्या चांगलच पसंत केलं जात आहे. मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषचं लग्नानंतरचं आयुष्य सुरु झालं आहे. या दोघांमध्ये आता प्रेमळ नात्याची सुरुवात झाली आहे. आता अरुंधतीने मालिकेत पुन्हा एंट्री घेतली असून त्यानंतर मालिकेचं कथानक कसं बदलणार ते पाहणं महत्वाचं ठरेल. एवढंच नाही तर यानंतर अरुंधती आणि आशुतोषचं नातं देखील नव्याने बहरताना पाहायला मिळेल. त्यामुळे आगामी काही भाग पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.