JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte: 'तू माझ्या वाकड्यात शिरलास तर...' अरुंधतीचं लग्न रोखण्यासाठी अनिरुद्धची नवी खेळी

Aai Kuthe Kay Karte: 'तू माझ्या वाकड्यात शिरलास तर...' अरुंधतीचं लग्न रोखण्यासाठी अनिरुद्धची नवी खेळी

अरुंधतीच्या आयुष्यातील अडचणी काही संपता संपत नाहीयेत. आता ती आशुतोषसोबत नवीन संसार सुरु करत असताना अनिरुद्धच्या रूपाने मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

जाहिरात

आई कुठे काय करते

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 फेब्रुवारी:  ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दररोज रंजक अशा घडामोडी सुरुच असतात. मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षक अगदी खिळून असतात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची बोलणी सुरु आहे. आशुतोष सुरुवातीपासूनच अरुंधतीला पसंत करत होता.दरम्यान आता अरुंधतीनेसुद्धा आशुतोषला लग्नाला होकार दिलेला आहे. त्यामुळे ते दोघे लवकरच एक होणार असं वाटत असताना त्यांच्या आयुष्यातील अडचणी काही संपताना दिसून येत नाहीत. अनिरुद्धच्या रूपाने मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. अरुंधतीने अखेर काहीही झालं तरी आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पा, यश, अनघा आणि संजनाचा अरुंधतीच्या लग्नाला पाठींबा आहे. पण कांचन आणि अनिरुद्धला अरुंधतीने दुसरं लग्न करणं मान्य नाही.  अरुंधती दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत असताना अनिरुद्ध चांगलाच बावचळला आहे. तो या दोघांचं लग्न मोडण्यासाठी नवनवीन डाव खेळतो आहे. अशातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. प्रोमो पाहून अरुंधती आणि आशुतोषला आपल्या लग्नासाठी आणखी काही अडचणींना सामोरं जावं लागणार असल्याचं दिसून येत आहे. हेही वाचा - Shiv Thakre: ‘मीच खरा…’ एमसी स्टॅनने विजेतेपद जिंकताच शिव ठाकरेची पहिली प्रतिक्रिया चर्चेत मालिकेत अप्पा अनिरुद्धला थेट आव्हान देणार आहेत. प्रोमोमध्ये ते म्हणतात कि, ‘तुझ्या बापाचं तुला चॅलेंज आहे. अरुंधतीच्या लग्नाचा मांडव मी याच घरात घालणार. तीची पाठवणी याच घरातून होणार’ हे ऐकून अनिरुद्ध चांगलाच चिडतो. यानंतर तो लग्न थांबण्यासाठी आशुतोषकडे जातो. तो आशुतोषला म्हणतो, ‘तुझा निर्णय चुकतोय, अरुंधती अतिशय…’ तेवढ्यात आशुतोष त्याला थांबवतो आणि म्हणतो ‘बास अनिरुद्ध, तू काहीही केलंस तरी आमचं लग्न होणार आहे’ त्यावर अनिरुद्ध म्हणतो कि, ‘तू जर माझ्या वाकड्यात शिरलास तर सगळं गमावशील.’

संबंधित बातम्या

आता अनिरुद्ध अरुंधतीच्या लग्नात विघ्न आणणार असं दिसतंय. अप्पांच्या या निर्णयामुळे अनिरुद्ध चांगलाच चिडला आहे त्यामुळं तो काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच अरुंधती आणि आशुतोषचं लग्न सुरळीतपणे पार पडेल कि काही विघ्न येईल हे पाहण्याची सुद्धा प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

आई कुठे… या मालिकेबाबत सतत नवनव्या अपडेट्स जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक असतात. नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्याचं दिसून येत आहे. आता मालिकेचं कथानक अतिशय रंजक वळणावर असून पुढे काय होणार  हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या