मुंबई, 8 मे- छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte ) ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करताना दिसतात. दिवसेंदिवस या कलाकारांची लोकप्रियता ही वाढतच चालली आहे. मालिका जरी अरुंधतीभोवती फिरत असली तर अनिरुद्ध, संजना या नकारत्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या अभिनयाचे तितकेच कौतुक होत असतं. मालिकेत अनिरुद्धची भूमिका मिलिंद गवळी साकारताना दिसतात. या भूमिकेमुळे मिलिंद यांना वेगळी ओळख व लोकप्रियता दिली. मिलिंद गवळी ( Milind Gawali ) नेहमीच सोशल मीडियावर मालिकेबद्दल असेल किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल मत मांडत असतात. आज मदर्स डे (Mothers Day 2022) आहे. मिलिंद गवळी यांनी देखील आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे. मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. सध्या त्यांच्या आईविषयी पोस्टनं सर्वाचं लक्षवेधून घेतलं आहे. त्यांनी इन्स्टावर आईचे काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 21 जून 1946 रोजी माझी आई इतरांची सेवा करण्यासाठी आणि प्रेम वाटण्यासाठी या पृथ्वीवर अतवरली होती. 2 मार्च 2009 या दिवशी ती या ग्रहावरून निघून गेली. तिने आयुष्यभर लोकांना मदत केली. ती आयुष्यभर इतरांसाठी जगली. त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेत. ती नेहमी म्हणायची, आपल्याला आयुष्य फक्त एकदाच मिळते, म्हणून त्याचा पूरेपूर फायदा घ्या आणि इतरांबद्दल द्वेष वा वाईट भावना बाळगू नका. नेहमी आनंदी राहा. वाचा- ‘पावनखिंड’ पाहून भारावून गेली रविना टंडन, मराठी सिनेमाबद्दल म्हणाली.. एकेदिवशी तिने मला एक सुंदर गोष्ट सांगितली होती. ती अशी होती की, एके दिवशी एक साधू नदीजवळून जात होता आणि त्याला एक विंचू बुडताना दिसला. त्याने त्याला बाहेर येण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला पण विंचू त्याला चावू लागला. तरीही तो साधू त्याला बाहेर येण्यास मदत करत गेला. एका वाटसरूने हे पाहिलं आणि त्याला विचारलं. साधू, विंचू तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही त्याला मदत करण्याचा प्रयत्न का करत आहात? वाचा- Mother’s Day: ‘आई कुठे काय करते’ने आणला नवा फंडा, रील्स बनवायचा दिला मंत्रा साधूने उत्तर दिलं, ‘एवढा लहान प्राणी आपला स्वभाव आणि चावण्याची नैसर्गिक वृत्ती सोडत नाही मग मी इतरांना मदत करण्याचा माझा स्वभाव का सोडू ? तो त्याचे काम करतो आणि मी माझं काम करत आहे.’हे जीवन आनंदी आणि इतरांसाठी आनंदानं जगण्यासाठी माझ्या आईनं अनेक शिकवणी आणि अतुलनीय आशीर्वादाच्या खूप सुंदर आठवणी सोडल्या.
जग आज मदर्स डे साजरा करत आहे.आपण सर्वांनी प्रत्येक दिवशी मातृदिन साजरा करूया. कारण प्रत्येक आई बिनशर्त प्रेमासाठी पात्र आहे…त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने तर कमेंट करत म्हटलं आहे की, इन्स्टाग्राम ओपन करताना आज वाटलेच होते की मिलिंद सरांची आई वर ची पोस्ट असणार..आणि होतीच! फार थोर आई आपल्याला लाभली.. संपूर्ण जगात आपल्यावर अगदी खरं प्रेम करणारी ती एकच असते..आई🙏yes only mother lives for you and loves you unconditional!!❤️…यापूर्वी देखील मिलिंद यांनी अशीच त्यांच्या वडिलांसाठी पोस्ट लिहिली होती.