अश्विनी महांगडे
मुंबई, 13 जून: आई कुठे काय करते मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात लोकप्रिय आहेत. त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशातच आता या मालिकेत अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिने एका खास व्यक्तीसोबत रोमॅंटिक असा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीनं प्रेमाची कबुली दिली आहे. खऱ्या आयुष्यात कोणाच्या प्रेमात आहे अरुंधतीची सून जाणून घ्या. अश्विनी महांगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत त्याला दिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. अश्विनी निलेश जगदाळे सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अश्विनीने निलेशसोबतचा हा रोमँटिक व्हिडिओ शेअर करताना ‘माझं प्रेम’ असं देखील म्हटलं आहे. अश्विनी आणि निलेशचा हा व्हिडीओ एका लग्न सोहळ्यातील आहे.
या व्हिडिओमध्ये निलेश फोटोसाठी पोज देण्यापूर्वी अश्विनीचा ड्रेस व्यवस्थित करताना दिसत आहे. त्यानंतर अश्विनी त्याच्याकडे कौतुकाने पाहते. हा व्हिडीओ शेअर करताना अश्विनीनं लिहिलंय की, ‘“प्रेम” या शब्दाला एका भावनेत कैद नाही करता येणार. अनेक सुखं - दुखं: , समाधान, शांती, संकटं, परीक्षा असे एक ना अनेक गोष्टीतून जाण्याचा प्रवास आहे तो. आलेले कठीण प्रसंग प्रेमाला अधिक आकार देत असतात. त्यातून बाहेर पडता नाही आले तर थोडे थांबा, विसावा घ्यावा आणि परत एकदा तो प्रवास करण्यासाठी सज्ज व्हावे.’’ Dharmendra: लाडक्या नातवाच्या लग्नाच्या विधींमध्ये सहभागी होणार नाहीत धर्मेंद्र; काय आहे कारण? ती पुढे म्हणते, ‘एक गोड, सुंदर नातं म्हणजे काय? खरे तर खूप लोक यावर छान छान बोलतात. आपण बऱ्याच ठिकाणी “नातं” यावरचे लेख वाचतो. पण माझ्या मते तो एक अनुभव आहे. हजारो चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, स्वभाव वेगेवगळे असतात आणि प्रत्येकामध्ये गुण, दोष असतात. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत कोण आहे यावर त्या व्यक्तींचे नाते ठरते. प्रवास हा प्रत्येकाचा स्वतंत्र असतो पण त्या प्रवासात आपली माणसं सोबत असतील तर तो प्रवास सुखद आणि सोप्पा होतो.’ अश्विनीच्या या पोस्टवर चाहते आता वेगवेगळ्या कमेंट्स करत या दोघांचं प्रेम अबाधित राहण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. दरम्यान यापूर्वी देखील अश्विनीने निलेश जगदाळे सोबत अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हिडिओ शेअर केले आहेत. निलेश जगदाळे आहे एक व्यावसायिक आहे. अश्विनीच्या सामाजिक कार्यात निलेशची देखील साथ तिला मिळताना दिसते. अश्विनी महांगडेने रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या कामात देखील तो नेहमीच तिच्यासोबत असतो.
अश्विनीनं शेअर केलेल्या या व्हिडिओत जो व्यक्ती दिसत आहे. तो खास व्यक्ती अनेकदा अश्विनीसोबत दिसत असतो. यापूर्वी देखील अश्विनीनं याच्यासोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. निलेश जगदाळे व्यावसायिक आहे. अश्विनीच्या सामाजिक कार्यात निलेशची देखील साथ तिला मिळताना दिसते. अश्विनी महांगडेने रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या कामात देखील तो नेहमीच तिच्यासोबत असतो. अश्विनीने आता हा व्हिडीओ शेअर करत निलेशवरील प्रेमाची कबुलीच दिली आहे.