JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Smoking वरुन राडा; कमरेवरील कृपाण काढून झोमॅटो बॉयच्या छातीत खुपसला, जागेवरच मृत्यू

Smoking वरुन राडा; कमरेवरील कृपाण काढून झोमॅटो बॉयच्या छातीत खुपसला, जागेवरच मृत्यू

ही सर्व घटना रात्री घडली. या घटनेनंतर निहंगे फरार झाले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जून : दिल्लीच्या (Delhi) टिळक नगरमधील झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयची हत्या (Murder) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार (Murder of Zomato’s Delivery Boy) समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका छोट्याशा गोष्टीवरुन निहंगे शीखांचा झोमॅटो डिलिव्हरी बॉयसोबत वाद झाला होता. यात निहंग्यानी त्याची हत्या केली. डिलिव्हरी बॉय सिगारेट पित होता. यामुळे निहंग नाराज झाले आणि ते त्याच्यासोबत वाद घालू लागले. साधारण रात्री 12.30 वाजता पोलिसांना याबाबत सूचना मिळाली होती. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत पीडित्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या छातीतच सुरा खुपसण्यात आला होता. या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आलं असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. कृष्ण पुरी भागातील 13 क्रमांकाच्या गल्लीत हे तिघेही उभे होते. रेस्टॉरंटमधून डिलिव्हरी घेतल्यानंतर सागर तेथेच उभं राहून सिगारेट पित होता. यादरम्यान काही निहंग्यांसोबत त्याचा वाद झाला. सिगारेटवरुन वाद झाल्यानंतर सागर त्यांचा रस्ता रोखत होता. त्यांनी सागरला हटण्यात सांगितलं, मात्र मृताने नकार दिला, असंही काहीचं म्हणणं आहे. या सर्व वादानंतर त्यांनी कमरेला लावलेलं कृपाण काढलं आणि सागरच्या छातीत खुपसलं. यानंतर रेस्टॉरंट मालकाने त्याला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान दुसऱ्या एका डिलिव्हरी बॉयने दिलेल्या माहितीनुसार, बराच वेळ सागरच्या मृतदेहाला कोणी हात लावला नव्हता. तो त्या रस्त्यावरुन जात असताना त्याने सागरला जमिनीवर बेशुद्धावस्थेत पाहिलं. तो तातडीने तेथे गेला. तोपर्यंत बराच रक्तस्त्राव झाला होता. तोपर्यंत कोणीच त्याच्या मदतीला आलं नव्हतं. वेळीत त्याला रुग्णालयात नेलं असतं तर तो वाचला असता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या