Home /News /maharashtra /

Amravati: पेढ्यात गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीचं अपहरण, आरोपींनी धावत्या कारमध्ये केला सामूहिक बलात्कार

Amravati: पेढ्यात गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीचं अपहरण, आरोपींनी धावत्या कारमध्ये केला सामूहिक बलात्कार

Representative Image

Representative Image

Amravati crime news: धावत्या कारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अमरावती, 15 जून : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता अमरावती (Amravati)मधून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार (minor girl gang raped in moving car) झाला आहे. अमरावतीमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीत अल्पवयीन अद्यापही सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा पुढे आल आहे. एका अल्पवयीन मुलीला चक्क पेढ्यातून गुंगीच औषध देऊन, तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता तिच्या मामाच्या गावाला असताना आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर 12 जूनच्या रात्रीला तिला चारचाकीमध्ये बसवून गुंगीच औषध देत तिचे लचके तोडले आहे. वाचा : VIDEO: दारूची बाटली चोरायला गेलेल्या चोरांचीच फजिती; CCTV मध्ये कैद झाली घटना  भेदरलेल्या परिस्थितीमध्ये पीडित मुलगी परतवाडा पोलिसांत पोहोचली. तिने दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध अपहरण, सामूहिक अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले. तसेच दोन आरोपींना अटक केली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत. मुंबईत 19 वर्षीय महिलेवर तीन महिन्यांपासून सामूहिक बलात्कार मुंबईतील कुर्ला परिसरात 19 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित महिलेच्या भावोजींचाही आरोपांमध्ये समावेश आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले जणार आहे. भिकाऱ्यांकडून पैसे घेत पीडितेच्या भावोजींनी त्यांच्या हवाले मेहुणीला केलं. इतकंच नाही तर भावोजीनेही तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला शहरात नवीन असल्याने ती प्रचंड घाबरली आणि या बाबत तिने कुणालाही सांगितलं नाही. काही दिवसांनी पीडित महिला गरोदर झाल्याचं लक्षात येताच हा सर्व प्रकार उघडकीस आला. पुण्यात महिलेवर बसमध्ये बलात्कार पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. ट्रॅव्हल्स चालकानं स्वारगेट परिसरात महिलेचं अपहरण केलं आहे. एवढंच नाही तर अपहरण करून आरोपीनं महिलेवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. खोलीच्या शोधात असताना ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगून ट्रॅव्हल्स सुरू करून कात्रज परिसरात नेली आणि तेथे बलात्कार केला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Amravati, Crime, Gang Rape

पुढील बातम्या