JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / दारु पिता पिता मित्रानेच झाडली गोळी, उपचारांसाठी राहिला तडफडत

दारु पिता पिता मित्रानेच झाडली गोळी, उपचारांसाठी राहिला तडफडत

मित्रासोबत तो दारु पार्टी करायला बसला होता. दारु चढल्यावर आपलाच मित्र आपल्यावर गोळी झाडेल, याची त्यानं स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेरठ, 6 जानेवारी: दोन मित्र (Friends) दारु पार्टी (Drinks party) करत असताना एका मित्राने दुसऱ्याला गोळी मारल्याची (Fired bullet) धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या मानेला घासून (Neck) गोळी गेल्यामुळे तो गंभीर जखमी (injured) झाला. प्रचंड रक्तस्त्राव (Blooding) होऊन तो वेदनेनं तडफडू लागला. मात्र त्याला कुठलीही मदत न करता मित्र थंडपणे तिथून निघून गेला. मित्रानेच मित्रावर असा हल्ला केल्याने सर्वांनाच त्याचं आश्चर्य वाटत होतं. अशी घडली घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये राहणारा वासिद नावाचा तरुण त्याचा मित्र आरिफसोबत पार्टी करत होता. पार्टीत प्रमाणाबाहेर मद्यप्राशन झाल्यानंतर वासिदच्या मित्राने वाद घालायला सुरुवात केली. दोघांनीही वादविवाद सुरु केल्यानंतर थोड्याच वेळात त्याचं स्वरूप भांडणानं घेतलं आणि दोघंही आक्रमक झाले. या गदारोळात मित्राने वासिदची मान पकडली आणि मानेवर गोळी झाडली. मानेच्या एका बाजूचा वेध घेऊन ही गोळी गेली आणि मित्र या घटनेत गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेतून रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. त्याने मित्राला मदत करण्याची विनंती केली. मात्र दारूच्या नशेत असलेल्या मित्राने त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिथून काढता पाय घेतला. मित्र निघून गेल्यानंतर वासिद उपचारांसाठी आणि मदतीसाठी तडफडत राहिला. हे वाचा- मुंबई लोकल बंद होणार? जिल्हाबंदी होणार की lockdown? आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं… नागरिकांनी घेतली धाव गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी काय घडलंय, हे पाहण्यासाठी तिकडे धाव घेतली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला वासिद त्यांना दिसला. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची कल्पना दिल्यावर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि वासिदला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. वासिदवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पोलीस फरार आरिफचा शोध घेत आहेत. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या