JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / महिलेने घरीच बाळाला जन्म दिला अन् फेकलं बादलीत…, परिस्थिती ऐकून सगळेच हादरले

महिलेने घरीच बाळाला जन्म दिला अन् फेकलं बादलीत…, परिस्थिती ऐकून सगळेच हादरले

केरळमधील अलाप्पुझा येथे एक विचित्र घटना घडली आहे. एका महिलेने पैशाअभावी आपल्या बाळाला घरातच जन्म दिला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अलप्पुझा(दिपक राज), 05 एप्रिल : केरळमधील अलाप्पुझा येथे एक विचित्र घटना घडली आहे. एका महिलेने पैशाअभावी आपल्या बाळाला घरातच जन्म दिला होता. दरम्यान तिला वेदना सहन होत नसल्याने ती ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेतच रुग्णालयात दाखल झाली. यावेळी त्या महिलेने मी एका बाळाला जन्म दिला आहे. माझे बाळ घरीच एका बादलीत पडलं आहे त्याला वाचवा अशी तिने विनवणी केली. यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली.

यावेळी पोलिसांनी तातडीने पावले उचलत त्या महिलेच्या घरी पोहोचले. ते बाळ मृत आहे कि जिवंत याबाबत पोलिसांनाही समजतन नसल्याने आहे त्या अवस्थेत त्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरी बाळंतपणानंतर महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने चेंगन्नूर येथील रुग्णालयात दाखल केले. तिने हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना सांगितले की तिने घरी मुलाला जन्म दिला. यावेळी ते नवजात अर्भक तीला मृत वाटल्याने तिने तिच्या घरात बादलीत त्या बाळाला टाकून आली होती.

संबंधित बातम्या

त्यानंतर अधिकाऱ्यांनी ताबडतोब अलाप्पुझा पोलिसांना कळवले, पोलिसांनी तीच्या घरी तातडीने धाव घेत तपासणी केली यावेळी नवजात बाळ एका बादलीत पडलेले आढळले. नवजात शिशू अजूनही थरथरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला तात्काळ चेंगन्नूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. नवजात बालकाचे वजन केवळ 1.3 किलो असून ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

जाहिरात
प्रेयसीने लग्न केले नाही म्हणून गिफ्ट म्हणून दिला ‘बॉम्ब’, नंतर जे घडलं ते धक्कादायक

नंतर, पोलिसांनी मुलाच्या सुरक्षिततेसाठी पठाणमथिट्टा बाल कल्याण समितीला माहिती दिली आणि स्वयंसेवकांच्या मदतीने मुलाला पुढील काळजी आणि उपचारासाठी कोट्टायम वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या