प्रतिकात्मक छायाचित्र
मुंबई, 8 मार्च : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादर पश्चिममध्ये इमारतीच्या छतावरून उडी मारून एका महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे. रोहिणी रमेश पाटील वय 64 वर्ष असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. संपूर्ण आयुष्य निरोगी जगल्या मात्र म्हतारपणात कर्करोगानं ग्रासल्यानं त्या मानसिकरित्या खचल्या होत्या. यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात दादर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. परिसरात खळबळ घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रोहिणी रमेश पाटील या दादर पश्चिममध्ये असलेल्या वर्तक हॉल समोरील साईकृपा इमारतीत कुटुंबासोबत राहत होत्या. त्या रोज सकाळी या सात मजली इमारतीच्या गच्चीवर फेरफटका मारण्यासाठी जात असत. नेहमीप्रमाणे त्या बुधवारी देखील इमारतीच्या गच्चीवर गेल्या, मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांनी इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. इमारतीच्या खाली त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकारानं परिसरात खळबळ उडाली आहे.
जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया आयुष्यभर निरोगी आयुष्य जगल्या मात्र ऐन म्हतारपणात कर्करोग झाला. कर्करोगामुळे त्या तणावात होत्या. ही खंत त्यांनी अनेकदा आपल्या कुटुंबाकडे देखील व्यक्त केली होती. त्यांच्यावर गेल्या जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया देखील झाली होती. मात्र मानसिकदृष्या खचल्यानं त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा सून व नात असा परिवार आहे.