JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / फ्लॅटमध्ये बंद होते 16 कुत्रे; त्यांच्यासोबतच राहात होती महिला, 3 वर्षांनी दरवाजा उघडताच दिसलं भयाण दृश्य

फ्लॅटमध्ये बंद होते 16 कुत्रे; त्यांच्यासोबतच राहात होती महिला, 3 वर्षांनी दरवाजा उघडताच दिसलं भयाण दृश्य

फ्लॅटच्या आत इतका उग्र वास येत होता, की त्यात क्षणभरही उभं राहणं कठीण होतं. महिलेची अवस्थाही चांगली नव्हती.

जाहिरात

16 कुत्र्यांसोबत राहात होती महिला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 जुलै : एका महिलेच्या फ्लॅटमधून 16 कुत्र्यांची सुटका करण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. या महिलेनं अनेक वर्षांपासून या कुत्र्यांना आपल्या फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलं होतं.. आश्चर्य म्हणजे महिलेच्या फ्लॅटमध्ये वीजपुरवठा नव्हता. तर, संपूर्ण फ्लॅट कुत्र्यांच्या मलमूत्राने भरला होता. फ्लॅटच्या आत इतका उग्र वास येत होता, की त्यात क्षणभरही उभं राहणं कठीण होतं. महिलेची अवस्थाही चांगली नव्हती. यानंतर सर्च वॉरंट जारी करून कुत्र्यांची सुटका करण्यात आली. ही अजब घटना दिल्लीतून समोर आली आहे दिल्ली MCD ला माहिती मिळाली होती की GK-I पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या GK-I मधील आयबीएचएएस (IBHAS) सोसायटीच्या बी-ब्लॉकमधील फ्लॅटमध्ये एक महिला राहते. 2-3 वर्षांपासून महिलेनं 15-16 कुत्रे आपल्या फ्लॅटमध्ये बंद करून ठेवले होते. निर्दयीपणाचा कळस! दोन कुत्र्यांना भर चौकात दिली फाशी; छ. संभाजीनगरमधील घटनेने खळबळ फ्लॅटमध्ये वीजपुरवठाही नव्हता. यासोबतच महिलेच्या फ्लॅटमधून भीषण दुर्गंधी येत होती. माहिती मिळताच एमसीडीची टीम महिलेच्या घरी पोहोचली. फ्लॅटच्या आत गेल्यावर त्यांना दिसलं, की तिथे बरीच कुत्री आहेत आणि फ्लॅटमध्ये सर्वत्र घाण पसरलेली आहे. फ्लॅटकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर कुत्र्याचे मलमूत्र पडलेले होते. फ्लॅटमध्ये इतका उग्र वास येत होता की क्षणभरही उभं राहणं कठीण होत होतं. त्याचवेळी फ्लॅटमध्ये असलेल्या कुत्र्यांचीही स्थिती चांगली नव्हती. त्यांना योग्य आहार मिळत नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. एमसीडी टीमने महिलेला कुत्र्यांना त्यांच्या उपचारासाठी SPCA/MCD टीम्सकडे सोपवण्याची विनंती केली, परंतु महिलेनं ते मान्य केलं नाही. महिलेनं नकार दिल्यानंतर एमसीडी टीमने कायदेशीर पद्धत अवलंबली आणि कोर्टाकडून फ्लॅटसाठी सर्च वॉरंट जारी केलं. यानंतर जीके-1 पोलीस ठाण्याच्या पथकाने फ्लॅटमध्ये संयुक्त बचाव मोहीम राबवून कुत्र्यांची सुटका केली. जीके-1 पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध भादंवि कलम 269 आणि 291 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या