JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / दोन बाळांना सोबत घेत आईनं 19 व्या मजल्याहून मारली उडी; सुसाईट नोटमधून धक्कादायक खुलासा

दोन बाळांना सोबत घेत आईनं 19 व्या मजल्याहून मारली उडी; सुसाईट नोटमधून धक्कादायक खुलासा

एक महिला डिप्रेशनमुळे (Depression) इतकी हताश झाली होती, की तिला 200 फूट उंचीवरुन उडी घेण्याचीही भीती वाटली नाही. तिनं आपल्या दोन मुलांनाही सोबत घेतलं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 13 ऑक्टोबर : अतिशय उंचावरुन खाली पाहिल्यास अनेकांना चक्कर येते. मात्र, रशियामधील (Russia) एक महिला डिप्रेशनमुळे (Depression) इतकी हताश झाली होती, की तिला 200 फूट उंचीवरुन उडी घेण्याचीही भीती वाटली नाही. या आत्महत्येच्या घटनेतील (Suicide Case) आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं एकटीनं उडी घेतली नाही, तर तिनं आपल्या दोन चिमुकल्या बाळांनाही आपल्या कडेवर घेतलं आणि उडी मारली. सोलापुरात मुलाचं आईसोबत राक्षसी कृत्य; झोपलेल्या जागीच डोक्यात घातला दगड अन्… ही भयंकर घटना रशियाची राजधानी मॉस्को इथे घडली. महिलेनं आत्महत्या करण्याआधी आपल्या दोन्ही मुलांनाही हातात पकडलं. 19 व्या मजल्याहून उडी घेतल्यानं या घटनेत महिला आणि तिच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला. महिलेचा पती सैन्यात अधिकारी आहे आणि ही बातमी ऐकताच त्याला धक्का बसला. Mirror च्या वृत्तानुसार, ही महिला डिप्रेशनमध्ये होती. नुकतंच तिनं एका बाळाला जन्म दिला होता. शेजाऱ्याला तिनं आपल्या डिप्रेशनबाबत सांगितलं असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, ती एवढं मोठं पाऊल उचलेल याची कल्पना कोणालाही नव्हती. ओल्गा जारकोवा (Olga Zharkova) हिचा पती सैन्यात असल्यामुळे बराच काळ बाहेर राहात असे. यावरुनही तिनं अनेकदा तक्रार केली होती. सध्या तिचा पती या घटनेमुळे सदम्यात आहे. आरारारा खतरनाक… मुळशी पॅटर्न Birthday अंगाशी, पार्टीत तलवार नाचवली… आणि मग.. ओल्गानं हे धक्कादायक पाऊल उचल्याआधी एक सुसाईड नोटही (Emotional Suicide Note) लिहिली. यात तिनं लिहिलं, की या वाईट जगात आपल्या मुलांना एकटं ठेवण्याची तिची इच्छा नाही. त्यामुळे बाळांनाही ती आपल्यासोबत घेऊन जात आहे. महिलेनं याआधीही आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं होतं, की बाळाच्या जन्मापासूनच ती डिप्रेशनमध्ये आहे. तिला फार एकटं आणि थकल्यासारखं वाटत होतं. हे तिच्या आत्महत्येचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या