Home /News /maharashtra /

मुळशी पॅटर्न Birthday पडला महागात, पार्टीत तलवार नाचवली आणि मग पोलिसांनी आरोपींची चांगलीच जिरवली

मुळशी पॅटर्न Birthday पडला महागात, पार्टीत तलवार नाचवली आणि मग पोलिसांनी आरोपींची चांगलीच जिरवली

आरारारा खतरनाक... मुळशी पॅटर्न Birthday पडला महागात, पार्टीत तलवार नाचवली आणि मग पोलिसांनी आरोपींची चांगलीच जिरवली

आरारारा खतरनाक... मुळशी पॅटर्न Birthday पडला महागात, पार्टीत तलवार नाचवली आणि मग पोलिसांनी आरोपींची चांगलीच जिरवली

Mulshi Pattern birthday in Jalna: पोलीस आल्याचे पाहून तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

जालना, 13 ऑक्टोबर : मुळशी पॅटर्न चित्रपटप्रमाणे तलवारीने केक कापून बर्थडे सेलिब्रेट (Birthday celebration with sword) करणे जालन्यातील (Jalna) तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. वाढदिवसाला तलवार घेऊन नाचणाऱ्या या चौघांना सदर बाजार पोलिसांनी थेट तुरुंगात डांबलं आहे. शहरातील भीमनगर येथे काही तरुण मंडळी हातात तलवार घेऊन डीजेच्या तालावर उच्छाद मांडत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना (Sadar Bazar Police) नाईट पेट्रोलिंग करताना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघ आणि सहाययक फौजदार परशुराम पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी काही तरुण मंडळी डीजेच्या तालावर हातात तलवार घेऊन बर्थडे पार्टी सेलिब्रेट करत होती. पोलिसांनी गौतम गवई, ऍलन अलबर्ट, मोहम्मद फारूक आणि सिद्धार्थ मुळे या चौघांना अटक केली. चौघांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्लया माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजण्याट्या सुमारास पोलीस टीम पेट्रोलिंग करत होती. त्यावेळी भिमनगर जालना येथे काही तरुण तलवार घेऊन वाढदिवसाचं सेलिब्रेशन करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस आल्याचे पाहून तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतम गवई आणि मोहम्मद फारुख मोहम्मद इस्माईल यांना पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील 3 फूट 08 सेमी लांबीची स्टीलची तलवार सुद्धा जप्त कऱण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांना त्यांच्या इतर सहकाऱ्यांची नावे विचारली असता त्यांनी सांगितले, अॅलन ऊर्फ मिकी अल्बर्ट पाटोळे, सिद्धार्थ सुभाष मुळे हे पळून गेले. पोलिसांनी चारही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत. खोटेपणा उघड झाला अन् बीएमसीतील नोकरी गेली; बुलडाण्यात तरुणानं उचललं टोकाचं पाऊल बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील एका झाडाला गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आपला खोटेपणा उघड झाल्याने आलेल्या तणावातून संबंधित तरुणाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मंगेश हरिभाऊ पेरे असं आत्महत्या केलेल्या 35 वर्षीय युवकाचं नाव आहे. मृत मंगेश बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पण याठिकाणी तो दिनेश प्रल्हाद पेरे या नावाने नोकरी करत होता. दिनेश हा मंगेशचा मावस भाऊ होता. पण 2014 साली त्याचा आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगेश याने आपला मावस भाऊ दिनेश याच्या कागदपत्राचा वापर करत मुंबई महापालिकेत नोकरी मिळवली होती. तसेच 2020 पर्यंत तो नियमितपणे कामावर देखील येत होता. अलीकडेच मंगेशच्या पत्नीने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगेश विरोधात कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत, बीएमसी कार्यालयात पोहोचले. दरम्यान तपास सुरू असताना महापालिकेत काम करणारा दिनेश हाच मंगेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तरुणाचा खोटेपणा उघड झाल्यानंतर पालिकेनं त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Videos viral

पुढील बातम्या