JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / दारू प्यायला पैसे दिले नाही; नराधम बापाने 6 वर्षांच्या लेकाला तलावात बुडवून मारलं

दारू प्यायला पैसे दिले नाही; नराधम बापाने 6 वर्षांच्या लेकाला तलावात बुडवून मारलं

सहा वर्षीय कार्तिकला काहीच कळण्याच्या आत तो तलावात बुडाला आणि त्याचा जीव गेला. मुलाच्या आईने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

जाहिरात

रागाच्याभरात तो दोन मुलांना बाहेर घेऊन गेला आणि असं काही झालं की कोणी कल्पनाही केली नसेल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अभिषेक उपाध्याय, प्रतिनिधी आझमगड, 18 जून : दारू प्यायला पैसे दिले नाहीत, म्हणून नराधम बापाने मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये घडली आहे. मुलाच्या आईने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय कार्तिक आई डॉलीसोबत भदेवा मझौली या आपल्या आजोळी गेला होता. तिथे त्याचे वडील शनी रस्तोगी आले आणि डॉलीकडून दारूसाठी पैसे मागू लागले. तिने नकार दिल्यावर त्याने तिच्याशी भांडण केलं परंतु शेवटपर्यंत तिने पैसे दिलेच नाहीत. मग रागाच्याभरात तो कार्तिक आणि कुणाल या आपल्या दोन मुलांना घेऊन बाहेर गेला. त्यानंतर असं काही झालं की त्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

निरागस मुलं वडील बाहेर घेऊन जातात तर आनंदाने जायला निघाले. डॉलीलाही वाटलं की, हा नेहमीप्रमाणे मुलांना बाहेर घेऊन जातोय. मात्र त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. त्याने दोन्ही मुलांना जवळच्या तलावावर नेलं. नराधमाने दोघांनाही तलावात बुडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणाल जरा मोठा असल्याने तो त्याच्या तावडीतून कसाबसा निसटला आणि पळून गेला. परंतु सहा वर्षीय कार्तिकला काहीच कळण्याच्या आत तो तलावात बुडाला आणि त्याचा जीव गेला. Adipurush dialogue: ‘श्री राम तुम्हा सर्वांचे कल्याण करो’..असं म्हणत ‘छपरी’डायलॉग वादावर लेखकानं उचललं मोठं पाऊल डॉलीच्या तक्रारीनंतर आरोपी शनी रस्तोगीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पुरावे आणि कार्तिकच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या