पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला (प्रतिकात्मक फोटो)
अमरावती 23 जुलै : पत्नीने रागात पतीवर हल्ला केल्याचं एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेनं आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला. तिने हे भयानक पाऊल उचललं कारण तिचा नवरा त्याच्या पहिल्या पत्नीचं इन्स्टाग्राम रील पाहत होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील नंदीगामाचं आहे. इथे एक व्यक्ती पाच वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला होता. यानंतर त्याने दुसरं लग्न केलं आणि पाच महिन्यांपासून तो आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत मुप्पल्ला परिसरात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो इन्स्टाग्रामवर पहिल्या पत्नीचे रिल्स पाहत होता. हे पाहून दुसरी पत्नी खूप नाराज होती. दारू पिऊन बायकोला KISS करणं नवऱ्याला पडलं महागात; व्यक्तीसोबत भयंकर घडलं याच रागात रात्री उशिरा त्याच्या पत्नीने पतीला प्रश्न केला की तो त्याच्या पहिल्या पत्नीचे इन्स्टाग्राम रील का पाहत आहे. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. नवऱ्याने आपली बाजू मांडली. मात्र प्रकरण इतकं वाढलं की महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट पतीचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला. यानंतर पतीची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र गंभीर प्रकृती पाहून त्याला चांगल्या उपचारासाठी अन्य रुग्णालयात रेफर करण्यात आलं. या घटनेत पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. कानपूरमध्येही घडली होती अशीच घटना - याच महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूरमधूनही अशीच एक घटना समोर आली होती. ज्यात एका महिलेनं पतीला ब्लेडने प्रायव्हेट पार्ट कापून जखमी केलं होतं. या प्रकरणी पीडित व्यक्तीने आठवड्याभरानंतर पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्या व्यक्तीने सांगितलं होतं की, 14 जून रोजी त्याचं पत्नीसोबत काही गोष्टीवरून भांडण झालं होतं. यानंतर तो झोपला असताना पत्नीने ब्लेडने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि पळून गेली. लाज वाटत असल्याने त्याने याबाबत कोणालाही सांगितलं नाही. मात्र, आठवडाभरानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.