प्रातिनिधीक फोटो
कोटा, 18 जून : अनेकदा लोक नात्याची गरिमा विसरून असं काही करून बसतात की, ज्यामुळे त्यांना केवळ पश्चातापच करावा लागतो. अशीच एक घटना राजस्थानातील (Rajasthan News) कोटामधून समोर आली आहे. येथे मुलाच्या मृत्यूनंतर बापासमान सासऱ्याने सुनेची भयंकर अवस्था करून सोडली. त्याने दुसऱ्या सुनेलाही सोडलं नाही. शेवटी दोन्ही सुनांनी (Crime News) न्यायासाठी पोलीस ठाण्याचं दार ठोठावलं. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सुनेंनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय सासऱ्याने आपल्या विधवा सुनेला जीवंत (Rape on daughter in law) जाळण्याची धमकी देत एक वर्षांपर्यंत बलात्कार केला. तो दररोज तिच्यावर जबरदस्ती करीत होता. इतकच नाही तर त्याने छोट्या सुनेवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने नवऱ्यालाही याबाबत सांगितलं. मात्र त्याने काही ऐकलं नाही. शेवटी तिने पळ काढत थेट पोलीस ठाणे गाठलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मोठ्या सुनेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. मध्य प्रदेशात राहणारी 26 वर्षीय पीडितेचं लग्म 10 वर्षांपूर्वी कोटातील तरुणासोबत झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सर्व ठिक सुरू होतं. 11 महिन्यांपूर्वी तिच्या पतीचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूच्या साधारण एका महिन्यानंतर जेव्हा ती घरात काम करीत होती, त्या दरम्यान तिची सावत्र सासुने तिला सासराच्या खोलीत पाठवून बाहेरुन कडी लावून घेतली. सासऱ्याने दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला आणि कोणाला सांगितलं तर जीवंत जाळण्याची धमकी दिली. पीडितेने जेव्हा सासूला हा सर्व प्रकार सांगितला तर सासुने तिला मारहाण केली आणि गप्प बसायला सांगितलं. पीडितेचा मोबाइलदेखील घेतला. यानंतर अनेकदा सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. तिचं संपूर्ण कुटुंब मध्य प्रदेशात राहतं. तिला घरातल्यांना काहीच सांगू दिलं जात नव्हतं. शेवटी एकेदिवशी तिच्या घरातील मंडळी तिला घेऊन जाण्यासाठी आले होते. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. छोट्या सुनेसोबतही छेडछाड… सासऱ्याने छोट्या सुनेसोबतही गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने याला विरोध केला आणि पोलीस ठाण्यात सासऱ्याविषयी तक्रार केली.