JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / लग्नाआधीच सासरच्यांची नवरीला मारहाण; कारण जाणून तळपायाची आग मस्तकात जाईल

लग्नाआधीच सासरच्यांची नवरीला मारहाण; कारण जाणून तळपायाची आग मस्तकात जाईल

ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र लग्नापूर्वीच मुलीला सासरच्या मंडळींनी तिला बेदम मारहाण केली

जाहिरात

लग्नाआधीच सासरच्यांची नवरीला मारहाण (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 09 जुलै : लग्नाआधी सासरच्यांनी एका तरुणीसोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. यात तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने दोघांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न ठरवलं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनीही एक छोटा कार्यक्रमही केला. मग ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र लग्नापूर्वीच मुलीला सासरच्या मंडळींनी तिला बेदम मारहाण केली. उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात ही घटना घडली. सासरचे लोक लग्नासाठी हुंड्याची मागणी करत होते. यावर मुलीच्या वडिलांनी आक्षेप घेतल्यानंतर सासरच्या लोकांनी मुलीला घराबाहेर बोलावून तिच्याशी बोलणं केलं. मात्र लग्नाविषयी बोलता बोलताच सासरकडच्यांनी लग्नाआधीच तरुणीला बेदम मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि नंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला. लग्नापूर्वी मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. क्रूरतेचा कळस! वहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी बापाने स्वतःच्या मुलीचा चिरला गळा महिलांनी तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शाहाबाद शहरातील असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहााबादच्या काशीराम कॉलनीत राहणाऱ्या या तरुणीचे बेहटी गावात राहणारा नातेवाईक नरसिंगसोबत प्रेमसंबंध होते. याबद्दल समजताच मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाकडील लोकांवर लग्नासाठी दबाव टाकला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी लग्नाला सहमती मिळाली आणि 20 जून रोजी मुलीकडच्यांनी छोटा कार्यक्रमही केला. लग्नासाठी ऑक्टोबर महिन्यातील तारीख ठरली. दरम्यान, मुलाकडील लोकांनी मुलीकडे हुंडा म्हणून रोख पैसे आणि लग्नासाठी चांगला मॅरेज हॉल बुक करा, अशी मागणी केली. यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. त्यानंतर मुलाच्या बाजूच्या लोकांनी मुलीची समजूत काढण्यासाठी तिला शाहाबाद शहरातील पोलीस स्टेशनजवळ भेटायला बोलावलं होतं. जिथे मुलगी पोहोचली. पण तिचा काही गोष्टींवरुन मुलाच्या बाजूच्या महिलांसोबत वाद झाला. त्यानंतर मुलाच्या बाजूच्या महिलांनी तिला मारहाण केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या