प्रातिनिधीक फोटो
पाटणा 13 एप्रिल : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण (Weird Incident) समोर आलं आहे. येथे एका अविवाहित मुलीने बाळाला जन्म (Unmarried Girl Gave Birth to Baby) दिला आहे. मुलगी लग्न न करताच आई झाल्यामुळे कुटुंबात खळबळ उडाली. तरुणीने आपल्या प्रियकराला लग्न करण्यासाठी अनेकदा विचारणा केली, मात्र तो तयार नव्हता. दरम्यान, तरुणीने एका खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. या प्रकरणाबाबत तरुणीच्या कुटुंबीयांनी अनेकदा गावात पंचायत बोलण्याचा करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते होऊ शकलं नाही. ही बाब संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. बाप आहे की हैवान! तब्बल 4 वर्ष मुलाचा मृतदेह किचनमध्येच, वडिलांचं म्हणणं ऐकून पोलिसांनाही बसला धक्का मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण मधुबनीच्या झांझारपूर आरएस ओपीचं आहे. असं म्हटलं जात आहे की, गर्भवती तरुणीने तिच्या प्रियकराला अनेकवेळा लग्नाची विनंती केली, मात्र तो तयार झाला नाही. प्रशांत राऊत असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पंचायत बोलवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशांतचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील तणाव वाढला आणि हायव्होल्टेज ड्रामाही झाला. आता तरुणावर लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवतीचा प्रियकर आणि त्याच्या नातेवाईकांची भूमिका पाहता पीडित कुटुंबीयांने कायद्याचा आसरा घेतला आहे. ‘दैनिक जागरण’च्या वृत्तानुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी प्रशांत राऊत, रा. बलभद्रपूर, प्रभाव राऊत, प्रताप राऊत, लक्ष्मी राऊत, रोशनी कुमारी आणि शांती देवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, जेव्हा ते प्रशांतच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यामुळे त्याच्या कुटुबियांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली गेली. ‘मला मारहाण करून बाथरूममध्ये कोंडायची’; आईची क्रूरता सांगताना तरुणाला न्यायालयातच अश्रू अनावर तरुणीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की त्यांनी या संदर्भात 4 एप्रिल रोजीच पोलिसांकडे तक्रार केली होती, परंतु स्थानिक पोलिसांनी 12 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. पीडितेचं म्हणणं आहे की, प्रशांतच्या नातेवाइकांनी त्यांना मारहाण केली आणि आपण हे लग्न लावणार नाही तसंच पंचायतीचही ऐकणार नाही असं सांगितलं. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचं सांगितलं.