टेक्सास, 12 एप्रिल : अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने धक्कादायक खुलासा केला आहे. हे ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. 2018 पासून त्याच्या मुलाचा मृतदेह स्वयंपाकघरात ठेवल्याचा दावा त्या व्यक्तीने केला आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. त्याचवेळी पोलिसांनी आरोपीच्या मुलाचा सांगाडाही किचनमधून जप्त केला. न्यू बोस्टन पोलीस विभागाने आरोपीला अटक केली आहे. आजतकने हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, डेव्हिड मॅकमायकेल (67) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस ‘वेलफेअर चेक’ अंतर्गत डेविडच्या घरी पोहोचले होते. 29 मार्च रोजी अमेरिकेच्या वेळेनुसार संध्याकाळी 5:10 वाजता पोलीस 67 वर्षीय डेविडच्या घरी पोहोचले. खरंतर, एका कॉलरने पोलिसांना फोन केला आणि त्यांना या व्यक्तीच्या ठिकाणी ‘वेलफेयर चेक’ करण्यास सांगितले. जेव्हा पोलीस डेविडच्या घराबाहेर पोहोचले आणि डेविडला विचारले की, पोलीस इथे का आले आहेत हे त्याला माहीत आहे का? यावर डेव्हिडने उत्तर दिले- ‘कारण त्याच्या स्वयंपाकघरात एक मृतदेह आहे’. अमेरिकेमध्ये दहशतवादी हल्ला? घटनास्थळावरचा पहिला VIDEO आला समोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने नंतर सांगितले की हा मृतदेह त्याच्या मुलाचा आहे जो मे 2018 मध्ये मरण पावला होता. त्याच्या मुलाचे नाव जेसन मॅकमाइकल होते. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी साउथवे स्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सला पाठवले आहे. त्याचवेळी मृतदेहाचा गैरवापर केल्याप्रकरणी डेविडला अटक करण्यात आली होती. मृत्यू गुलदस्त्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा जीव कशाने गेला? याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, बापाने तब्बल 4 वर्ष मुलाचा मृतदेह घरात का आणि कसा ठेवला? हे कोडं अद्याल उलगडलं नाही. चार वर्षात मुलाच्या मृत्यूबद्दल कोणालाच माहिती मिळाली नसल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कुठल्याही नातेवाईकाने मुलाबद्दल चौकशी का केली नाही? शेजाऱ्यांना मृतदेहाचा वास कसा आला नाही? या गोष्टीही अजून समोर यायच्या बाकी आहेत. दरम्यान, ज्याअर्थी मुलाचा मृतदेह इतक्या दिवस घरातच ठेवला त्यावरुन यात बापाचा हात असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टी आता पोलीस तपासातच समोर येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.