JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! शेतात बैल घुसल्याने भडकले काका; जळगावातील पुतण्याचा थेट जीवच घेतला

धक्कादायक! शेतात बैल घुसल्याने भडकले काका; जळगावातील पुतण्याचा थेट जीवच घेतला

पुनमचंद भोसले यांची बैलजोडी त्यांचे चुलत काका प्रल्हाद भोसले यांच्या शेतात गेल्याने वाद झाला होता. या वादात प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले यांनी पूनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला.

जाहिरात

प्रातिनिधिक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदुरकर, जळगाव 01 डिसेंबर : राज्यात गुन्हेगारी च्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच आता जळगाव मधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अगदी क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद विकोपाला पोहोचला आणि एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. घटनेत बैल शेतात घुसल्याच्या कारणावरून चुलत काकांनी पुतण्याच्या डोक्यावर काठीने वार केला. विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, प्रेमवीर सरपंचाने घेतलं विष, जिल्हाधिकाऱ्यांनी लावला डोक्याला हात काकाने डोक्यात वार केल्याने यात गंभीर जखमी झालेल्या पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या वाडी शेवाळे येथे घडली. याप्रकरणी चुलत काका आणि चुलत भावाविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुनमचंद भोसले यांची बैलजोडी त्यांचे चुलत काका प्रल्हाद भोसले यांच्या शेतात गेल्याने वाद झाला होता. या वादात प्रल्हाद भोसले यांनी पूनमचंद भोसले यांच्या मुलाच्या पाठीत काठीने वार केला. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले यांनी पूनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. सुनेवर ठेवली वाईट नजर, मुलाने केला वार.. नवऱ्याचे 22 तुकडे केल्याचे आरोपी महिलेची कबुली या घटनेत पूनमचंद भोसले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रल्हाद भोसले आणि त्यांचा मुलगा गणेश भोसले या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेमुळे वाडी शेवाळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या